पहिल्या बॉलवरही सिक्स...
पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा याने मोठा खुलासा केला. मी माझ्या टीमसाठी काम पूर्ण केलं याचा मला आनंद आहे. मी आधीही सांगितलं आहे की, मी नेहमी फ्लोसोबत जातो. जर बॉल माझ्या रेंजमध्ये असेल, तर मी पहिल्या बॉलवरही सिक्स मारण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या टीमला पॉवरप्लेचा फायदा मिळवून देतो, असं अभिषेक शर्मा म्हणाला. त्यावेळी त्याने आपल्या रणनीतीबद्दल देखील सांगितलं.
advertisement
मोठे शॉट्स खेळण्याचा निर्णय
काही मॅचमध्ये मला पहिल्या बॉलवरच आक्रमक खेळायचे होते, कारण काही बॉलर्स पहिल्या बॉलवरच विकेट घेण्याचा प्रयत्न करतात. ही फ्रेश विकेट होती. बॉल स्विंग होत होता, त्यामुळे मी आणि शुभमनने विकेट नीट पाहून मग मोठे शॉट्स खेळण्याचा निर्णय घेतला, असंही अभिषेक शर्मा म्हणाला. त्यावेळी त्याने आपल्या खेळात बदल कसा केला, ज्यामुळे तो विरोधी संघावर आघात करतो, याबद्दल देखील सांगितलं.
नेटमध्ये आऊट न होण्याचा प्रयत्न
दरम्यान, मी नेहमी फील्ड पाहून त्यानुसार शॉट्स मारण्याचा प्रयत्न करतो. नेट प्रॅक्टिसमध्ये मी खूप मेहनत घेतली आहे. बॅटरला जास्त बॉल खेळायला मिळतात, तीच वेळ असते, असं म्हणत त्याने आतली बातमी सांगितली. नेटमध्ये जास्त शॉट्स मारल्यास तुम्ही आऊट होऊ शकता, पण मी सराव करताना नेटमध्ये आऊट न होण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणत अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीचं सिक्रेट सांगितलं आहे.