कधीच सुधारणार नाहीत पाकिस्तानी
आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर ही घटना घडली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने 39 बॉलमध्ये 74 रनची धमाकेदार खेळी केली, ज्यामुळे टीम इंडियाने विजय मिळवला. या खेळीबद्दल अभिषेक शर्माला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. पाकिस्तानी चाहत्यांना मात्र अभिषेकच्या या बॅटिंगचा फारच त्रास झाला आणि त्यांनी सामूहिकरित्या त्याची प्रोफाईल रिपोर्ट केली. मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट झाल्यामुळे अभिषेक शर्माची प्रोफाईल सस्पेंड करण्यात आली.
advertisement
अभिषेक शर्माचा आशिया कपमध्ये धमाका
अभिषेक शर्मा आशिया कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंतच्या 5 इनिंगमध्ये त्याने 49.60 च्या सरासरीने आणि 206.66 च्या स्ट्राईक रेटने 248 रन केले आहेत. मैदानातली अभिषेक शर्माची ही कामगिरी पाकिस्तानच्या चाहत्यांना रुचली नाही आणि त्यांनी रडीचा डाव खेळून मैदानाबाहेर अभिषेक शर्मावर सगळा राग काढला, त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांवर जगभरातून टीका केली जात आहे.