मुंबई इंडियन्सने सत्यनारायण राजू (30 लाख), रीस टॉपली ( 75 लाख), के श्रीजित ( 30 लाख), कर्ण शर्मा ( 50 लाख), अर्जुन तेंडुलकर (30 लाख), बेवॉन जेकब्स (30 लाख), मुजीब उर रहमान (2 कोटी), लिझार्ड विलियम्स (75 लाख), विघ्नेश पुथ्थुर (30 लाख)अशा 9 खेळाडूंना रिलीज केले आहे. यावर आता महेला जयवर्धने प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
जेव्हा तुम्ही फ्रँचायझी असता, तेव्हा कधीकधी तुम्हाला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून भावनिकदृष्ट्या अलिप्त राहावे लागते आणि नेमके काय आवश्यक आहे ते पहावे लागते,असे
महेला जयवर्धने सुरूवातीला म्हणाला आहे.
तसेच तुमच्यासोबत राहिलेल्या आणि कठोर परिश्रम केलेल्या खेळाडूंना सोडून देणे कठीण असते, विशेषतः तरुण खेळाडू कारण ते खरोखरच खूप मेहनत करतात. मला त्यांच्यापैकी प्रत्येकासोबत काम करण्याचा आनंद मिळाला. मी त्यांना वैयक्तिकरित्या फोन केला आणि त्यांना का सोडण्यात आले आहे याची कारणे समजावून सांगितली. तसेच स्वतःला सुधारण्यासाठी त्यांना काय करण्याची आवश्यकता आहे हे जाणून घेण्याचा त्यांना अधिकार आहे. हे कठीण संभाषणे आहेत परंतु फ्रँचायझी क्रिकेट म्हणजे हेच आहे, प्रत्येकाची आठवण येईल आणि त्यांना शुभेच्छा. मला खात्री आहे की त्यांना पुढे संधी मिळतील, असे देखील महेला जयवर्धने म्हणाला आहे.
शार्दुल ठाकूरच्या ट्रेडवर काय बोलला?
महेला जयवर्धेने मुंबईच्या ट्रेडवरही बोलला आहे. शेरफेन भरपूर अनुभव घेऊन येतो, तो काही काळापासून आमच्यासोबत आहे आणि अनेक वर्षांपूर्वी आमच्यासोबत होता. शार्दुल असाच आणखी एक खेळाडू आहे, खूप अनुभव आहे. तो अनुभवाचा घटक आणि स्थानिक मुंबईचा मुलगा तसेच वानखेडेमध्ये खेळण्याचा त्याचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. मयंक एक योद्धा आहे. जेव्हा तो आमच्यासोबत होता, तेव्हा तो चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाचा भाग म्हणून हुशार होता. आम्ही त्याला बऱ्याच काळापासून पाहत आहोत,असे त्याने सांगितले
मुंबईने कुणाला सोडलं?
सत्यनारायण राजू (30 लाख)
रीस टॉपली ( 75 लाख)
के श्रीजित ( 30 लाख)
कर्ण शर्मा ( 50 लाख)
अर्जुन तेंडुलकर (30 लाख)
बेवॉन जेकब्स (30 लाख)
मुजीब उर रहमान (2 कोटी)
लिझार्ड विलियम्स (75 लाख)
विघ्नेश पुथ्थुर (30 लाख)
मुंबईने रिटेन केलेले खेळाडू
अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, मिचेल सॅन्टनर, नमन धीर, रघू शर्मा, राज अंगद बावा, रॉबिन मिन्झ, रोहित शर्मा, रियान रिकलटन, शार्दुल ठाकूर, शरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, विल जॅक्स
