खरं तर ही घटना 11 व्या ओव्हर दरम्यान घटना घडली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंह ही ओव्हर घेऊन मैदानात आला होता.यावेळी अर्शदिपच्या पहिल्याच बॉलवर क्विटन डि कॉकने षटकार मारला होता. या षटकारानंतर दोन वाईड आणि एक डॉट बॉल त्याने काढला.त्यानंतर त्याने परत चार वाईड टाकले त्यानंतर शेवटच्या बॉल आधी देखील त्याने एक वाईड टाकला.अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये सात वाईड टाकले आहे.
advertisement
टी२० मध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक टाकलेले बॉल
13- नवीन-उल-हक विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, 2024
13 - अर्शदीप सिंग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुल्लनपूर, 2025*
12- सिसंदा मगाला विरुद्ध पाकिस्तान, जोहान्सबर्ग, 2021
अर्शदिपने एकाच ओव्हरमध्ये 13 बॉल टाकले आहे. त्याच 7 वाईट आणि एक मिळून अर्शदिपने एका ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या आहेत. विशेष म्हणजे अर्शदिपची ही टी फॉरमॅटमधली दुसरी सर्वाधिक ओव्हर ठरली आहे. याआधी अफगाणिस्तानच्या नवीन उल हकन झिंम्बाबे विरूद्ध 13 बॉलची ओव्हर टाकली होती. ही घटना 2024 ला घडली होती.त्याच्यानंतर अर्शदिपचा नंबर लागतो. त्यानंतर तिसऱ्या स्थानी सिसांदा मंगाला हा खेळाडू आहे.त्याने पाकिस्तान विरूद्ध 12 बॉलची ओव्हर टाकली होती.
दरम्यान 7 वाईड टाकल्यानंतर अर्शदिपकडून पुढची ओव्हर चांगली टाकली जाईल अशी अपेक्षा होती. पण 19 व्या ओव्हरमध्ये पुन्हा दोन वाईड टाकल्या आहे. तसेच याच ओव्हरमध्ये त्याला दोन सिक्स देखील बसले आहेत. अशाप्रकारे त्याच्या ओव्हरमध्ये 16 धावा काढण्यात आल्या आहेत.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन : रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
