अश्विनने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर काहीच दिवसांपूर्वी त्याने आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली. भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे अश्विनला परदेशातल्या लीगमध्ये खेळणं शक्य झालं आहे. बीबीएलशिवाय अश्विन आयएलटी20 मध्येही खेळणार आहे. आयएलटी20 चा लिलाव पुढच्या आठवड्यात होणार आहे, यासाठी अश्विनची बेस प्राईज सर्वोच्च आहे.
आयएलटी20 मध्ये अश्विन 2 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान खेळेल, त्यामुळे तो बीबीएलच्या पहिल्या 3 आठवड्यांसाठी उपलब्ध नसेल. बीबीएलची लीग स्टेज 18 जानेवारीपर्यंत तर अंतिम सामने 20 ते 25 जानेवारी दरम्यान होणार आहेत.
advertisement
इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणारे माजी प्रशिक्षक ट्रेवर बेलिस हे आता सिडनी थंडरचे प्रशिक्षक आहेत. तसंच डेव्हिड वॉर्नर हा सिडनीचा कर्णधार आहे. मागच्या बीबीएल फायनलमध्ये सिडनीला होबार्ट हरिकेन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाचा टेस्ट ओपनर सॅम कॉन्स्टास हादेखील सिडनी थंडरचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कर्णधार पॅट कमिन्स करारबद्ध नसतानाही सिडनी थंडरसोबत संलग्न आहे. कमिन्स हा टेस्ट क्रिकेटमुळे 2019 पासून सिडनी थंडरसाठी खेळलेला नाही.
अश्विन कधी खेळणार?
सिडनी थंडरचे या मोसमातील शेवटचे चार सामने 6,10,12 आणि 16 जानेवारीला आहेत. यापैकी 3 सामन्यांना अश्विन उपलब्ध असेल. आयएलटी20 मध्ये अश्विनची टीम आधीच बाहेर झाली तर मात्र अश्विन सिडनीकडून जास्त मॅच खेळू शकेल.
अश्विन पाकिस्तानी खेळाडूसोबत
आर. अश्विन हा बीबीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूसोबत ड्रेसिंग रूम शेअर करेल. शादाब खान हादेखील सिडनी थंडर्सच्या टीममध्ये आहे.