हस्तांदोलनावरून झालेल्या वादामध्ये मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांची भूमिका मर्यादित होती. पायक्रॉफ्ट पाकिस्तानच्या कर्णधाराला हस्तांदोलन होणार नसल्याचं सांगू शकले असते, पण खेळाडूंनी हस्तांदोलन करावं, असं आयसीसीचा नियम नाही, त्यामुळे पायक्रॉफ्ट यांना या तक्रारीवरून हटवण्यात येणार नाही, अशी आयसीसीची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
धमकी पाकिस्तानलाच महागात पडणार?
आता पायक्रॉफ्ट युएईविरुद्धचा सामन्यात मॅच रेफरी असतील तर आम्ही खेळणार नाही, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली खरी, पण आता ही धमकी त्यांनाच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तान खरंच युएईविरुद्ध खेळलं नाही, तर त्यांचं आशिया कपमधील आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात येईल.
advertisement
युएईला लागणार लॉटरी?
आशिया कपमध्ये युएईने ओमानचा पराभव केला, त्यामुळे पाकिस्तान आणि युएई यांचे प्रत्येकी 2-2 पॉईंट्स झाले आहेत. तर भारताचा आधीच सुपर-4 मध्ये प्रवेश झाला आहे. आता पाकिस्तान किंवा युएई यांच्यापैकी एकच टीम सुपर-4 मध्ये जाईल. पाकिस्तानने युएईविरुद्ध खेळण्यास नकार दिला, तर या सामन्याचे दोन्ही पॉईंट्स युएईला मिळतील, त्यामुळे युएई सुपर-4 मध्ये प्रवेश करेल, पण यामुळे पाकिस्तान मात्र ग्रुप स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर होईल.