टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार शुभमन गिलने इंग्लंड विरूद्ध टेस्ट मालिकेत उत्कृष्ट कामिगिरी केली होती.या स्पर्धेनंतर तो दुलीप ट्रॉफी स्पर्धेत नॉर्थ झोन संघाचे नेतृत्व करणार होता. पण तो अचानक आजारी पडल्यामुळे त्याला नॉर्थ झोनच्या दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यातून बाहेर पडावे लागले होते. पण आता तो बरा झाल्यामुळे बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याच्या सहकाऱ्यांसोबत सामील होण्यास सज्ज आहे. जिथे आशिया कपपूर्वी भारतीय क्रिकेटपटूंच्या नियमित फिटनेस मूल्यांकन चाचण्या घेतल्या जातील.
advertisement
शुभमन गिलच्या रक्ताचे रिपोर्ट समोर आले आहेत. या रिपोर्टमध्ये कोणतीही गंभीर आरोग्याची समस्या जाणवत नाही आहे. त्यामुळे आशिया कपपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला.त्यामुळेच टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय खेळाडू या आठवड्यात बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सामील होऊन पुन्हा प्रशिक्षण सुरू करेल.
गिल व्यतिरिक्त इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत सहभागी झालेले अनेक भारतीय खेळाडू फिटनेस मूल्यांकनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सामील झाले आहेत. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून फलंदाजी करणारा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी अद्याप बरा झालेला नाही, तर हार्दिक पंड्याने फिटनेस चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतर बडोद्यामध्ये सराव सुरू केला आहे.
कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि बी साई सुधरसन हे त्यांच्या फिटनेस आणि कोअर स्ट्रेंथिंगवर काम करताना दिसले आहेत. मोहम्मद सिराज लवकरच त्यांच्यात सामील होणार आहेत. ऋषभ पंतबद्दल बोलायचे झाले तर, या धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाजाच्या डाव्या पायाचे प्लास्टर काढून टाकण्यात आले आहे आणि तो पुनर्प्राप्ती प्रक्रियेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रवेश करेल.
आशिया कपपूर्वी शुभमन गिलची फिटनेस स्थिती भारतासाठी एक सकारात्मक संकेत आहे. जिथे ते लीग टप्प्यात पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा सामना करतील.