TRENDING:

Asia Cup : टीम इंडियाचा प्लान बॅकफायर झाला, सूर्या-गंभीर चूक सुधारणार, अन्यथा हातातून जाणार ट्रॉफी!

Last Updated:

IND vs BAN बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे, पण या सामन्यातले काही प्लान टीम इंडियावरच उलटले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा (75 रन) ने ठोकलेलं लागोपाठ दुसरं अर्धशतक आणि स्पिनर कुलदीप यादवच्या 3 विकेट तसंच वरुण चक्रवर्तीच्या 2 विकेटमुळे भारताने आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात बांगलादेशचा 41 रननी पराभव केला. या विजयासोबतच टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे.
टीम इंडियाचा प्लान बॅकफायर झाला, सूर्या-गंभीर चूक सुधारणार, अन्यथा हातातून जाणार ट्रॉफी!
टीम इंडियाचा प्लान बॅकफायर झाला, सूर्या-गंभीर चूक सुधारणार, अन्यथा हातातून जाणार ट्रॉफी!
advertisement

अभिषेक शर्माने 37 बॉलमध्ये 75 रनची आक्रमक खेळी केली, ज्यात 6 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. अभिषेक शर्माच्या या खेळीनंतरही टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून फक्त 168 रनच करता आल्या. दुसरीकडे बांगलादेशकडूनही फक्त ओपनर सैफ हसन हाच एक बाजू लढवत होता. सैफ हसनने 51 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 69 रन केल्या. बांगलादेशची टीम 19.3 ओव्हरमध्ये 127 रनवर ऑलआऊट झाली. या सामन्यातही भारतीय टीमने कॅच सोडले.

advertisement

गंभीर-सूर्याचा प्लान फेल

लिटन दासच्या गैरहजेरीत झाकिर अलीने भारताविरुद्ध बांगलादेशचं नेतृत्व केलं. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने त्यांच्या बॅटिंग लाईनअपमध्ये बदल केले, पण त्यांचा हा प्लान अपयशी ठरला, त्यामुळे चांगल्या सुरूवातीनंतरही टीम इंडियाला 170 रनचा आकडा गाठता आला नाही.

अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंगला आले, पण तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव ऐवजी शिवम दुबे बॅटिंगला आला. तर चौथ्या क्रमांकावर तिलक वर्माऐवजी सूर्यकुमार यादव आला. पाचव्या क्रमांकावर हार्दिक, सहाव्या क्रमांकावर तिलक वर्मा आणि सातव्या क्रमांकावर अक्षर पटेलने बॅटिंग केली. आशिया कपआधी टीम इंडियाचा ओपनर असलेल्या संजू सॅमसनला या सामन्यात बॅटिंगचीच संधी मिळाली नाही. बॅटिंग क्रमवारीमध्ये एवढे चढ-उतार झाल्यामुळे कोणत्याच खेळाडूला छाप पाडता आली नाही.

advertisement

फायनलआधी चूक सुधारावी लागणार

टीम इंडिया फायनलआधी सुपर-4 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची मॅच खेळणार आहे. हा सामना फक्त औपचारिकता असली तरी भारतीय टीमला सर्वोत्तम प्लेयिंग इलेव्हनसह मैदानात उतरावं लागणार आहे, ज्यामुळे फायनलमध्ये कोणतीही घोडचूक होऊ नये.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : टीम इंडियाचा प्लान बॅकफायर झाला, सूर्या-गंभीर चूक सुधारणार, अन्यथा हातातून जाणार ट्रॉफी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल