याआधी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ग्रुप स्टेज आणि सुपर-4 सामन्यावेळी एकाच ब्रॉडकास्टरने दोन्ही कर्णधारांना प्रश्न विचारले होते, पण मागच्या दोन सामन्यांनंतर भारत-पाकिस्तानच्या टीममधला तणाव वाढला होता. आशिया कपच्या फायनलआधी पीसीबी आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी उचकवणारी वक्तव्य केली होती. 'भारताविरुद्ध तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी सांभाळून घेईन', असं नक्वी म्हणाले. यानंतर आशिया कपच्या फायनलमध्ये टॉसवेळी वाद निर्माण झाला. रवी शास्त्रींना उत्तर द्यायचं नाही म्हणून पाकिस्तानने वकार युनूसला प्रश्न विचारण्यासाठी बोलावलं.
advertisement
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान वाद
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या सामन्यापासून वाद पाहायला मिळाले. 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. याचा निषेध म्हणून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा मॅच संपल्यानंतरच्या सोहळ्याला आणि पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला नाही. तसंच सुपर-4 मधल्या सामन्यानंतर सलमान आघाने भारतीय पत्रकारांना प्रश्न विचारायला मनाई केली. तर पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनीही टाळाटाळ करणारी उत्तरं दिली.
दुसरीकडे भारतीय खेळाडूंनाी मात्र कठीण प्रश्नांनाही उघडपणे तोंड दिलं. हस्तांदोलन वादावेळी सूर्यकुमार यादवने आत्मविश्वासाने उत्तर देऊन मनं जिंकली, पण फायनलमध्ये पाकिस्तानने दोन ब्रॉडकास्टर मैदानात उतरवून पुन्हा एकदा रडारड केली.