दुसरीकडे पाकिस्तानची टीम आशिया कपच्या फायनलमध्ये रडतखडत पोहोचली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तानला श्रीलंका आणि बांगलादेशला हरवावं लागणार होतं. या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा विजय झाला असला, तरीही त्यांना मैदानामध्ये संघर्ष करावा लागला. दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानची बॅटिंग गडगडली, पण बॉलिंगमुळे पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली. या दोन्ही सामन्यांमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशच्या बॅटरनीही खराब फटके खेळले, ज्याचा फायदा पाकिस्तानला झाला.
advertisement
शोएब अख्तरने भारताला डिवचलं
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या आशिया कपच्या फायनलआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारताला डिवचलं आहे. 'पाकिस्तानने रविवारी भारताचा गर्व ठेचला पाहिजे. पाकिस्तानने या सामन्यात त्याच ऍटिट्यूडने गेलं पाहिजे. आक्रमण करा आणि भारताला तुम्ही कशाचे बनले आहात ते दाखवा. इंडिया अडचणीत आहे, हे त्यांना समजलं पाहिजे', असं शोएब अख्तर म्हणाला आहे.
काय म्हणाला पाकिस्तानचा कॅप्टन?
दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यानेही फायनलमध्ये जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. 'जर तुम्ही अशा मॅच जिंकत असाल, तर तुमची टीम स्पेशल आहे. प्रत्येक जण चांगला खेळला. बॅटिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, यावर आम्ही काम करू. शाहीन हा स्पेशल खेळाडू आहे. टीमला जे पाहिजे ते तो देतो. त्याच्याबद्दल खूश आहे. आम्ही 15 रन कमी केले होते. पण आम्ही सुरूवातीला चांगली बॉलिंग केली, त्यामुळे दबाव निर्माण झाला. नवीन बॉलने आम्ही चांगली बॉलिंग केली', असं सलमान आघा म्हणाला.
'अशी बॉलिंग केली तर तुम्ही बहुतेक मॅच जिंकाल. आम्ही फिल्डिंगही चांगली करत आहोत. फिल्डिंग सुधारण्यासाठी सराव सत्र वाढवली आहेत. तुम्ही चांगली फिल्डिंग करत नसाल तर तुम्ही टीममध्ये नसाल, हे कोच माईक हेसनने सांगितलं आहे. आम्ही कोणत्याही टीमला हरवण्यासाठी सज्ज आहोत. आम्ही रविवारी येऊ आणि जिंकण्याचा प्रयत्न करू', असा इशारा सलमान आघाने टीम इंडियाला दिला आहे.