सूर्या खेळला जुगार
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय टीम जसप्रीत बुमराहच्या रुपात एकमेव स्पेशलिस्ट बॉलर घेऊन खेळत आहे. दुसरा फास्ट बॉलर म्हणून टीम इंडियाकडे फक्त शिवम दुबे हाच पर्याय आहे. टीम इंडियाच्या या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याआधी सुपर-4 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शिवम दुबेने चांगली बॉलिंग केली होती, पण शिवम दुबे हा स्पेशलिस्ट बॉलर नाही. शिवम दुबे हा आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळतो. सीएसकेमध्येही दुबेला इम्पॅक्ट सब म्हणून वापरलं जातं, म्हणजेच बॅटिंग झाल्यानंतर दुबेला ड्रेसिंग रूममध्ये पाठवलं जातं, त्यामुळे त्याच्यावर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांनी इतका विश्वास कसा ठेवला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
5 बॉलरसह टीम इंडिया मैदानात
संपूर्ण आशिया कपमध्ये टीम इंडिया 6 किंवा त्यापेक्षा जास्त बॉलिंग पर्याय घेऊन मैदानात उतरली आहे, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताकडे फक्त 5 बॉलर आहेत. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि शिवम दुबे या 5 बॉलरवरच सूर्यकुमार यादवला अवलंबून राहावं लागणार आहे. यातल्या एकाही बॉलरवर पाकिस्तानच्या खेळाडूंनी आक्रमण केलं, तर सूर्याकडे बॉलिंगसाठी दुसरे पर्यायही उपलब्ध नाहीयेत.
भारताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती