मोहसीन नक्वी हे आपणच ट्रॉफी देणार म्हणून अडून बसले होते, पण भारताने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला, त्यामुळे फक्त पाकिस्तानी खेळाडूंना उपविजेतेपदाचं मेडल देण्यात आलं. यानंतर अभिषेक शर्माला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, तर तिलक वर्माला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
अभिषेक शर्माच्या पुरस्कारानंतर ब्रॉडकास्टर सायमन डूल यांनी भारतीय टीम पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं जाहीर करून टाकलं. मोहसीन नक्वी स्टेजवर असल्यामुळे आम्ही पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं भारतीय टीमने सांगितलं, त्यामुळे आशिया कपची ट्रॉफी न घेताच भारतीय टीम स्टेडियममधून परत फिरली.
advertisement
भारत-पाकिस्तान सामन्यात राडा
मोहसीन नक्वी यांनी ऑपरेशन सिंदूर वेळी भारताविरुद्ध वादग्रस्त आणि निराधार वक्तव्य केली होती. दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेलेले असतानाच आशिया कपचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या तीनही सामन्यांमध्ये वाद पाहायला मिळाले. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करायला नकार दिला, तसंच सूर्यकुमार यादवने पहिला विजय भारतीय लष्कराला समर्पित केला, तसंच सूर्याने पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख केला. सूर्याच्या या वक्तव्याविरोधात पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली.
यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू हारिस राऊफ याने विमान पाडल्याचं तसंच 6-0 चे इशारे केले आणि साहिबजादा फरहान याने अर्धशतकानंतर एके-47 चालवल्याच्या खुणा केल्या. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वर्तनाविरोधात बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार दाखल केली, यानंतर हारिस राऊफच्या मॅच फीचे 30 टक्के पैसे कापण्यात आले आणि तसंच त्याला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला.
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आशिया कपच्या फायनलमध्येही दोन्ही टीममध्ये तणाव पाहायला मिळाला. टॉसवेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने रवी शास्त्री यांच्यासोबत बोलायला नकार दिला, त्यामुळे वकार युनूसही टॉससाठी आला. यानंतर सूर्यकुमार यादवची मुलाखत रवी शास्त्री यांनी घेतली, तर सलमान आघाला वकार युनूसने प्रश्न विचारले.