कोण कुणावर भारी?
आशिया कप 1984 मध्ये सुरू झाला आणि तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 वनडे सामने खेळले गेले आहेत. भारताने यापैकी 8 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 5 वेळा विजय मिळवला. यापैकी दोन सामने अनिर्णित राहिले आहेत किंवा निकाल लागला नाही. एकूणच, आशिया कप वनडे सामन्यांमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे.
advertisement
टी-20 आशिया कपमध्ये कोण पुढे?
वनडे व्यतिरिक्त भारत-पाकिस्तानच्या टीम टी-20 आशिया कपमध्ये 5 वेळा आमनेसामने आल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये भारताचे वर्चस्व अधिक स्पष्ट आहे. 5 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला तर पाकिस्तानने फक्त एकच मॅच जिंकली आहे.
भारताचे पाकिस्तानवर वर्चस्व
वनडे आणि टी-20 दोन्ही सामने एकत्र केले तर, आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 20 सामने झाले आहेत. यापैकी 12 सामने भारताने जिंकले, तर फक्त 6 सामने पाकिस्तानने जिंकले, त्यापैकी दोन सामने अनिर्णित राहिले किंवा निकालाविना संपले, त्यामुळे आशिया कपमध्ये पाकिस्तानवर भारताचं कायमच वर्चस्व राहिल्याचं ही आकडेवारी सिद्ध करते.
भारत-पाकिस्तानचा पुन्हा महामुकाबला
रविवार 28 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 चा अंतिम सामना होणार आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. एकीकडे भारत पाकिस्तानविरुद्ध आपलं मजबूत रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल, तर पाकिस्तान इतिहास बदलण्याचा प्रयत्न करेल.