नकवी हे भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी आणि मेडल घेऊन ग्राऊंडमधून बाहेर पडले. या प्रकारानंतर टीम इंडियाने ट्रॉफीशिवाय सेलेब्रेशन केलं. हातात ट्रॉफी असल्याची अॅक्टींग करत संघाने जल्लोष केला. पण या सगळ्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नकवीने ट्रॉफी पळवल्याबद्दल सुर्याने राग व्यक्त केला आहे. त्याने एक्स अकाऊंटवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
"ज्यावेळी सामना संपतो, तेव्हा चॅम्पियन टीम लक्षात राहते. ट्रॉफीचा फोटो नाही," अशा शब्दात सुर्याने राग व्यक्त केला आहे. यावेळी त्याने तिलक वर्मासोबतचा एक फोटोही एक्स अकाऊंटवर पोस्ट केला. ज्यात दोघांच्या हातात आशिया कपची एडिट केलेली ट्रॉफी लावण्यात आली आहे. याच सगळ्या ड्राम्यावर सुर्याने पत्रकार परिषदेत देखील भाष्य केलं.
"माझ्या क्रिकेट कारकिर्दीत हे पहिल्यांदाच घडत आहे..."
सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी सुर्याने उत्तर दिलं, "माझ्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत मी कधीही विजेत्या संघाला ट्रॉफी न मिळालेली पाहिली नाही. आशिया कपमध्ये आमच्यासाठी हा एक उत्तम प्रवास होता आणि आम्ही खूप मजा करत आहोत. या काळात आम्हाला खूप मजा आली."