भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या या सामन्यात भारताची टॉप ऑर्डर आणि पाकिस्तानचे फास्ट बॉलर यांच्यात ज्याची कामगिरी चांगली होईल, तोच हा सामना जिंकण्याची शक्यता अधिक आहे. टीम इंडियाची टॉप ऑर्डर आणि शाहीन आफ्रिदी तसंच हारिस राऊफ यांच्यात रोमांचक लढत व्हायची अपेक्षा चाहत्यांना आहे. हे दोन्ही फास्ट बॉलर टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतात.
advertisement
अभिषेक शर्माचं आक्रमण
2025 च्या आशिया कपमध्ये शाहीन शाह आफ्रिदी अभिषेक शर्मा विरुद्ध महागडा ठरला आहे. त्याने 221 च्या स्ट्राईक रेटने 14 बॉलमध्ये 31 रन दिल्या आहेत, ज्यामध्ये 3 सिक्स आणि 2 फोरचा समावेश आहे. अभिषेक शर्माने आतापर्यंत हरिस राऊफ विरुद्ध फक्त एक फोर मारली आहे. त्याने राऊफ विरुद्ध 9 बॉलमध्ये 11 रन केल्या आहेत.
शुभमन गिलनेही केला पलटवार
आशिया कपमध्ये शुभमन गिलने शाहिन आफ्रिदीविरुद्ध 53 बॉलमध्ये 62 रन केल्या आहेत, ज्यात गिलचा स्ट्राईक रेट 120 पेक्षा कमी आहे तर त्याची सरासरी 31 ची आहे. आफ्रिदीने गिलला दोनदा आऊटही केलं आहे. तर दुसरीकडे हारिस राऊफविरुद्ध गिलला 22 बॉलमध्ये फक्त 14 रन करता आल्या आहेत, ज्यात तो एकदा आऊटही झाला आहे.
सूर्याचा संघर्ष
यंदाच्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून फार रन आलेल्या नाहीत. फायनलमध्येही सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. या क्रमांकावर खेळताना सूर्याने शाहिनविरुद्ध 6 बॉलमध्ये 6 रन केल्या आहेत, यातले 4 बॉल डॉट होते. शाहिनविरुद्ध सूर्या आऊट झाला नसला तरी तो संर्घष करत आहे. तर हारिस राऊफचं सूर्यकुमार यादवविरुद्धचं रेकॉर्ड चांगलं आहे. राऊफने सूर्याला 3 वेळा आऊट केलं आहे, तसंच सूर्याने राऊफविरुद्ध 10 बॉलमध्ये 11 रन केल्या आहेत.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या या कामगिरीकडे पाहिलं तर आशिया कपच्या फायनलमध्ये हारिस राऊफ हा शाहिन आफ्रिदीपेक्षा जास्त धोकादायक ठरू शकतो. यंदाच्या आशिया कपमध्ये राऊफने आतापर्यंत 9 विकेट घेतल्या आहेत. या स्पर्धेत राऊफ सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरला आहे.