आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या सीएसकेकडून खेळणाऱ्या तीक्षणाने त्याच्याच बॉलिंगवर चित्त्यासारखी चपळता दाखवली आणि गिलचा अफलातून कॅच पकडला. तीक्षणाने सुपरमॅनसारखी उडी मारून गिलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तीक्षणाच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 3 बॉलमध्ये 4 रन करून शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परतला.
टीम इंडियाचं श्रीलंकेवर आक्रमण
दुसऱ्याच ओव्हरमध्ये गिलची विकेट गेली तरी अभिषेक शर्माने श्रीलंकेच्या बॉलिंगवर आक्रमण सुरूच ठेवलं. अभिषेक शर्माने 31 बॉलमध्ये 196.77 च्या स्ट्राईक रेटने 61 रन केल्या, ज्यात 8 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय तिलक वर्माने 34 बॉलमध्ये नाबाद 49 रनची खेळी केली. संजू सॅमसनने 23 बॉलमध्ये 39 आणि अक्षर पटेलने 15 बॉलमध्ये नाबाद 21 रन केले. भारतीय खेळाडूंच्या या आक्रमक बॅटिंगमुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 202 रन केले. यंदाच्या आशिया कपमधला हा कोणत्याही टीमचा सर्वाधिक स्कोअर आहे.
advertisement
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली. या दोघांऐवजी हर्षीत राणा आणि अर्शदीप सिंग यांना संधी देण्यात आली आहे. टीम इंडिया याआधीच आशिया कपच्या फायनलला पोहोचली आहे, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी फायनलआधीची प्रॅक्टिस म्हणून पाहिलं जात आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेचं आशिया कपमधील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. रविवार 28 सप्टेंबरला दुबईमध्ये ही मॅच होणार आहे.