तिलक वर्मासोबत काय झालं?
तिलक वर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट बॅटिंग केली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तिलक वर्माने 34 बॉलमध्ये नाबाद 49 रन केल्या, ज्यात 4 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. तिलक वर्माला इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये अर्धशतक करण्याची संधी होती, पण त्याने टीमसाठी स्वत:चं अर्धशतक सोडलं आणि अक्षर पटेलला स्ट्राईकवर ठेवलं, ज्यामुळे भारताला 200 रनचा टप्पा पार करता आला.
advertisement
या खेळीसह तिलक वर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये दुसऱ्यांदा 49 रनवर नाबाद राहिला. दोनवेळा 49 रनवर नाबाद राहिलेला तो टी-20 आंतरराष्ट्रीय मधला जगातील पहिलाच बॅटर ठरला आहे. याआधी कोणत्याही खेळाडूसोबत असं घडलं नव्हतं.
टीम इंडियाच्या 202 रन
या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकल्यानंतर पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 202 रन केल्या. अभिषेक शर्माने 31 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 61 रन केल्या. तर संजू सॅमसनने 23 बॉलमध्ये 39 आणि अक्षर पटेलने 15 बॉलमध्ये नाबाद 21 रनची खेळी केली.