आफ्रिदीकडून राहुल गांधींचं कौतुक
भारत पुढचा इज्रायल बनण्याचा प्रयत्न करत आहे, पण राहुल गांधींचे विचार सकारात्मक आहेत. राहुल गांधी संवादाचे पुरस्कर्ते आहेत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालू इच्छितात, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला आहे. 'भारतातलं हे सरकार कायमच सत्ता मिळवण्यासाठी धार्मिक आणि हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतं. ही मानसिकता खराब आहे. राहुल गांधीची मानसिकता सकारात्मक आहे. त्यांना संवादावर विश्वास आहे. एक इज्रायल पुरेसं नाही का? तुम्ही दुसरं व्हायचा प्रयत्न करत आहात', असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीने लाईव्ह कार्यक्रमात केलं.
advertisement
भाजपकडून निशाणा
दरम्यान भाजपकडून शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. 'हाफिज सईदनंतर आता शाहिद आफ्रिदीनेही राहुल गांधींचं कौतुक केलं आहे, अजिबात आश्चर्य वाटत नाही. भारताचा द्वेष करणारा प्रत्येक जण राहुल गांधी काँग्रेसचा समर्थक असतो. सोरोस ते शाहिद... INC म्हणजे इस्लामाबाद नॅशनल काँग्रेस. काँग्रेस-पाकिस्तानची मैत्री जुनी आहे. 370, सर्जिकल स्ट्राईक, 26/11 ची क्लिन चीट, पुलवामा, पहलगाम... काँग्रेस आणि पाकिस्तानची भाषा सारखीच असते', अशी टीका भाजप नेते शहजाद पुनावाला यांनी केली आहे.