गिलला का केलं उपकर्णधार?
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला गिलला उपकर्णधार का केलं? याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'शुभमन गिल जेव्हा भारताकडून मागची टी-20 मॅच खेळला, तेव्हा तोच उपकर्णधार होता तर मी कर्णधार होतो. नवीन टी-20 वर्ल्ड कपच्या सत्राची आम्ही अशीच सुरूवात केली होती. यानंतर टेस्ट क्रिकेट खेळत असल्यामुळे तो उपलब्ध नव्हता, त्यामुळे तो टी-20 मॅच खेळू शकला नाही', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
उपकर्णधार असूनही जागा फिक्स नाही
दुसरीकडे याच पत्रकार परिषदेमध्ये निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे गिलला उपकर्णधार केलं, पण त्याच्या टीममधल्या स्थानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्लेयिंग इलेव्हनमध्ये गिल कुठे खेळणार? असा प्रश्न अजित आगरकर यांना विचारण्यात आला. तेव्हा 'आम्ही दुबईला पोहोचल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. याबाबतचा निर्णय टीमचं सर्वोत्तम संतुलन काय आहे, हे पाहून घेतला जाईल. मागच्या काही महिन्यांपासून गिल सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, तसंच संजूही फॉर्ममध्ये आहे. अभिषेक शर्मासोबत हे दोन चांगले पर्याय आहेत', असं उत्तर आगरकर यांनी दिलं. अजित आगरकर यांच्या या उत्तरामुळे गिलला उपकर्णधार केलं गेलं, असलं तरी त्याचं प्लेयिंग इलेव्हनमधलं स्थान काय? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.