वाराणसी, 17 नोव्हेंबर : आता सर्व क्रिकेटप्रेमींना 19 तारखेची आतुरता आहे. कारण या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ एकमेकांविरोधात वर्ल्ड कप 2023च्या विजेतेपदासाठी लढतील. भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास अत्यंत रोमांचक असा होता. भारतीय संघाने सलग 10 मॅच जिंकून फायनलमध्ये धडक दिली. तर, सुरुवातीच्या 2 मॅचमध्ये हरल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग 8 मॅच जिंकून फायनल गाठली. आता वर्ल्डकप (Ind Vs Aus WC Final 2023)भारताकडेच येणार, असं सर्व भारतीयांचं ठाम मत आहे, तर नेमकं कोण जिंकणार, याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. अशातच ज्योतिषांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
advertisement
वाराणसीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा भारताने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हा 1983 साली बुध ग्रह वृश्चिक राशीत होता. त्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा भारताने वर्ल्डकपवर नाव कोरलं, तेव्हा बुध ग्रह मेष राशीत, राहू ग्रह वृश्चिक राशीत आणि शनी ग्रह कन्या राशीत होता.
शमीच्या सत्त्याने वाढवले विमानांचे दर, World Cupसाठी अहमदाबाद होणार दिल्ली-मुंबईपेक्षा महाग!
आतासुद्धा बुध मेष राशीत आहे. तर, राहू मीन राशीत, शनी आपल्या मूळ त्रिकोण राशीत आणि मंगळ आपली स्वराशी असलेल्या वृश्चिकमध्ये आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताचं पारडं जड असणार, असं ज्योतिषी म्हणाले. परंतु दुसऱ्या बाजूला सध्या ऑस्ट्रेलियाचे ग्रह, तारेही त्यांच्याबाजूने भक्कम आहेत. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार हे निश्चित.
जेव्हा कॅप्टन कूल त्याच्या मूळगावी जातो तेव्हा...20 वर्षांनी गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू
वेळेबाबत बोलायचं झाल्यास 19 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजल्यापासून मॅच सुरू होईल. 2 वाजून 10 मिनिटांनी मीन लग्न होईल. याशिवाय राहू सप्तम भावात असेल, केतू आणि शुक्र कन्या राशीमध्ये असतील. तर, बुध आपल्या आठव्या स्थानात मंगळच्या राशीत असेल, ज्यामुळे विरोधी संघाला एकामागून एक विकेटचा सामना करावा लागू शकतो. ग्रहांची ही स्थिती पाहता वर्ल्ड कपमध्ये यंदा भारताचाच विजय होणार, अशी शक्यताही नाकारता यात नाही, असं भाकीत ज्योतिषांनी वर्तवलं आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g