शमीच्या सत्त्याने वाढवले विमानांचे दर, World Cupसाठी अहमदाबाद होणार दिल्ली-मुंबईपेक्षा महाग!

Last Updated:

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांना भिडतील. वर्ल्डकपचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला रंगणार आहे.

देश-विदेशातून क्रिकेटप्रेमी दाखल होणार असल्याने केवळ विमान उड्डाणच महागलेलं नाही, तर...
देश-विदेशातून क्रिकेटप्रेमी दाखल होणार असल्याने केवळ विमान उड्डाणच महागलेलं नाही, तर...
अहमदाबाद, 17 नोव्हेंबर : विराट कोहलीने मोडलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम, श्रेयस अय्यरने ठोकलेलं लय भारी शतक, शुभमन गिलच्या 80 धावा आणि मोहम्मद शमीच्या सात सुपरडुपर विकेट्स...असा रोमांचक क्षणांनी ओतपोत भरलेला सामना खेळून भारतीय संघाने वन डे वर्ल्डकप 2023च्या फायनलमध्ये धडक दिली. तर, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत ऑस्ट्रेलियानेही फायनल गाठली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकांना भिडतील.
वर्ल्डकपचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला रंगणार आहे. हा सामना प्रत्यक्ष बघण्यासाठी जगभरातले नागरिक उत्सुक आहेत. त्यामुळे दूरदूरहून क्रिकेटप्रेमी अहमदाबादमध्ये दाखल होतील, यात काही शंका नाही. हीच बाब लक्षात घेऊन आता विमानांचे तिकीट दरही वाढवण्यात आले आहेत. देशांतर्गत विमान उड्डाणांच्या किंमती 5 टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांच्या किंमती 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
advertisement
दरम्यान, देश-विदेशातून क्रिकेटप्रेमी दाखल होणार असल्याने केवळ विमान उड्डाणच महागलेलं नाही, तर अहमदाबादमध्ये हॉटेलचं भाडं, टॅक्सीचे दर, पार्किंग आणि खाद्यपदार्थही महागण्याची शक्यता आहे.
अहमदाबादला जाण्यासाठी विमान उड्डाणांच्या किंमती खालीलप्रमाणे :
advertisement
अंतरराष्ट्रीय
दुबई - इतर दिवशी : 10 हजार ते 15 हजार रुपये, सध्या : 70 हजार रुपये.
कॅनडा - इतर दिवशी : 50 हजार ते 1 लाख रुपये, सध्या : 1 लाख ते 1.80 लाख रुपये.
अमेरिका - इतर दिवशी : 50 हजार ते 1 लाख रुपये, सध्या : 1 लाख ते 2 लाख रुपये
advertisement
न्यूझीलंड - इतर दिवशी : 40 हजार ते 80 हजार रुपये, सध्या : 80 हजार ते 1.40 लाख रुपये.
देशांतर्गत
दिल्ली - इतर दिवशी : 3 हजार ते 5 हजार रुपये, सध्या : 24 हजार रुपये.
मुंबई - इतर दिवशी : 2 हजार ते 4 हजार रुपये, सध्या : 25 हजार रुपये.
advertisement
बंगळुरू - इतर दिवशी : 5 हजार ते 8 हजार रुपये, सध्या : 27 हजार रुपये.
हैदराबाद - इतर दिवशी : 6 हजार रुपये, सध्या : 30 हजार रुपये.
चेन्नई - इतर दिवशी : 6 हजार ते 8 हजार रुपये, सध्या : 18 हजार से 20 हजार रुपये.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
मराठी बातम्या/Viral/
शमीच्या सत्त्याने वाढवले विमानांचे दर, World Cupसाठी अहमदाबाद होणार दिल्ली-मुंबईपेक्षा महाग!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement