मोहम्मद शमीच्या 7 विकेट्सनं उफाळलं बायकोचं प्रेम, घटस्फोट कॅन्सल? म्हणते..., Video

Last Updated:

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये मोहम्मद शमीनं केलेली कामगिरी पाहून बायकोचं मनं पाझरल्याचं दिसतंय. तिनं सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केला आहे.

mohammed shami wife hasin jahan
mohammed shami wife hasin jahan
मुंबई, 17 नोव्हेंबर : क्रिकेटर मोहम्मद शमी वर्ल्ड कप 2023चा स्टार बॉलर ठरला.  उत्कृष्ट खेळ खेळत त्यानं भारताला विजय मिळवून दिला. भारताचा सर्वात फास्ट बॉलर म्हणून आज मोहम्मद शमी ओळखला जात आहे. 7 विकेट्स घेऊन मोहम्मद शमीनं दाखवून दिलं आहे की वर्ल्ड कप (World Cup 2023)स्पर्धेचा किती प्रबळ दावेदार आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून एका डावात 7 विकेट घेणारा भारताचा पहिला बॉलर नाही प्लेअर ऑफ द मॅच आहे. दरम्यान मोहम्मद शमीला मिळालेलं यश पाहून बायकोचं प्रेम उफाळून आल्याचं दिसत आहे.
मोहम्मद शमी सध्या प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर असला तरी त्याच्या पर्सनल आयुष्यात मात्र अनेक चढउतार सुरू आहेत. मोहम्मद शमीची बायको हसीन जहां चांगली चर्चेत आहे. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अद्याप त्यांचा घटस्फोट झालेला नाही पण दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये मोहम्मद शमीनं केलेली कामगिरी पाहून बायकोचं मनं उफाळल्याचं दिसतंय. तिनं सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केला आहे. मात्र त्यानंतर शमीच्या बायकोला चांगलंच ट्रोल करण्यात आलंय.
advertisement
मोहम्मद शमीची बायको हसीन जहां ही सोशल मीडियावर सक्रीय असते. तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘तेरे नाम से ही मुझको दुनिया वाले जानेंगे. तेरी सूरत देखकर ही लोग मुझे पहचानेंगे', या गाण्यावर तिनं लिप्सिंग व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओला तिला प्युअर लव्ह असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओमध्ये ती शेवटी लाजतानाही दिसतेय.
advertisement
advertisement
हसीन जहांचा हा व्हिडीओ पाहून मोहम्मद शमीच्या चाहत्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "ज्याच्यावर बायकोचं दडपण नसतं तो खूप फास्ट बॉलिंग टाकतो, आता मोहम्मद शमीकडेच बघा". तर दुसऱ्या युझरनं लिहिलंय, ‘आता तुला खूप पश्चाताप होत असेल ना?’ तसंच आणखी एका युझरनं म्हटलंय, 'माझं प्रेम माझ्या नकाराचा बदला घेईल'.
advertisement
दरम्यान काही दिवसांआधी हसीन जहांने एका मुलाखतीत तिनं शमीच्या चांगल्या खेळाबद्दल वक्तव्य केलं होतं. तिनं म्हटलं होतं की, "काहीही झालं तरी तो चांगला खेळतोय. चांगला खेळेला, टीममध्ये राहिल आणि चांगली कमाई करून आपलं भविष्य सुरक्षित करेल. मी टीम इंडियाला चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देईन पण त्याला नाही".
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मोहम्मद शमीच्या 7 विकेट्सनं उफाळलं बायकोचं प्रेम, घटस्फोट कॅन्सल? म्हणते..., Video
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement