भारतीय चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंनीही मिशेल मार्शला सुनावलं होतं. मिशेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला होता तर एका हातात बिअरची बॉटल होती. मोहम्मद शमीने म्हटलं होतं की, मिशेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवून विजेतेपदाचा अपमान केला आहे. आता मिशेल मार्शने यावर प्रतिक्रिया दिलीय.
Cricket : वनडे संघात निवड तरीही 32 वर्षीय क्रिकेटरनं घेतली अचानक निवृत्ती
advertisement
मार्शने फोटोबाबत ऑस्ट्रेलियाच्या सेनसोबत बोलताना म्हटलं की, त्या फोटोत कोणताही अनादर केला नाही. मी त्यावर फारसं लक्ष दिलं नाही. मी सोशल मीडियासुद्धा जास्त पाहिला नाही. त्यात असं काहीही नव्हतं आणि मला फरक पडत नाही.
मिशेल मार्शचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अलीगढच्या दिल्ली गेट पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. सायबर सेलचा रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितलं. वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि भारतानेही अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिलीय.