Cricket : वनडे संघात निवड तरीही 32 वर्षीय क्रिकेटरनं घेतली अचानक निवृत्ती
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या जोरावरच एकदिवसीय संघात त्याची निवड झाली होती.
दिल्ली, 01 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात निवड होऊनही वेस्ट इंडिजचा क्रिकेटर शेन डाउरिचने अचानक निवृत्तीची घोषणा केलीय. डाउरिचने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय. ३२ वर्षांचा असलेला डाउरिच वेस्ट इंडिजकडून ३५ कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची एकदिवसीय संघात निवड झाली होती. मात्र तरीही त्याने अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.
डाउरिचने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना डिसेंबर २०२० मध्ये खेळळा होता. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध डबलिनमध्ये खेळला होता. डाउरिच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वेस्ट इंडिजकडून खेळत होता.
नुकत्याच झालेल्या सुपर ५० कपमध्ये डाउरिचने ५ डावात ७८ च्या सरासरीने एका शतकासह २३४ धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या जोरावरच एकदिवसीय संघात त्याची निवड झाली होती. मात्र डाउरिचने अचानक निवृत्तीची घोषणा केली. डाउरिचने त्याच्या कारकिर्दीत कसोटी सामने जास्त खेळळे. ३५ कसोटी सामन्यात त्याने १५७० धावा केल्या आहेत.
advertisement
वेस्ट इंडिजच्या या यष्टीरक्षकाने निवृत्ती घेतल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेटचे संचालक माइल्स बासकोंबो यांनी डाउरिचच्या क्रिकेटमधील योगदानासाठी आभार मानले आहेत. आम्ही वेस्ट इंडिजसाठी त्याने दिलेल्या योगदानासाठी आभार मानतो. नेहमीच स्टम्पमागे त्याने सर्वोत्तम अशी कामगिरी केली. २०१९ मध्ये त्याने आठवणीत राहील असा विजय मिळवून दिला होता. मायदेशात जबरदस्त कसोटी शतक झळकावलं होतं. इंग्लंडला हरवण्यात आणि विजडन ट्रॉफी जिंकून देण्यात मदत केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2023 7:18 AM IST