बांग्लादेश अ संघाचा क्रिकेटपटू तोफेल अहमद रायहानवर एका तरूणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.क्रिकेटरने पीडितेला लग्नाचे वचन देखील दिले होते.या दरम्यान त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता. पण तो लग्न करण्यास नकार देत असल्यान पीडिते तरूणीने क्रिकेटर विरोधात पोलिसात तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार,क्रिकेटपटू तोफेल अहमद रायहानची फेसबुक या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एका तरूणीशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एकमेकांना भेटायला सूरूवात केली. तोफेर अहमद तरूणीला एका हॉटेलवर भेटायला न्यायचा.या दरम्यान त्याने तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचारही केला होता.
advertisement
विशेष म्हणजे क्रिकेटर तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा पण लग्नाची विनंती मान्य करायचा नाही.त्यामुळे अखेर या जाचाला कंटाळून पिडीत तरूणीने 1 ऑगस्ट रोजी गुलशन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर गुन्हाही दाखल झाला होता.
उच्च न्यायालयाने 24 सप्टेंबर रोजी तोफेलला सहा आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. जामिनाची मुदत संपण्यापूर्वी महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक न्यायाधिकरणासमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश न्यायालयाने त्याला दिले होते.तोफेलने न्यायालयाच्या आत्मसमर्पणाच्या आदेशाचे पालन केले नाही. उलट, अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर त्याने बांगलादेश 'अ' संघाचा भाग म्हणून हाँगकाँगमध्ये सहा-एक-सामन्यांच्या स्पर्धेत भाग घेतला.
"महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 9(1) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे," असे तपास अधिकारी, गुलशन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मोहम्मद सामिउल इस्लाम यांनी गुरुवारी (11 डिसेंबर) सांगितले.आरोपपत्रानुसार, पीडितेचे जबाब, हॉटेलचे रेकॉर्ड, वैद्यकीय तपासणीचे निकाल आणि अतिरिक्त पुराव्यांनी आरोपांना दुजोरा मिळाला आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 डिसेंबर रोजी होईल, त्यावेळी आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल.
