रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं वाढतं वय आणि मॅच प्रॅक्टिसचा अभाव, या दोन कारणांमुळे आगरकर आणि बीसीसीआयने रोहितच्या कॅप्टन्सीबद्दल हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. विराट आणि रोहितने आधीच टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता हे दोन्ही खेळाडू फक्त वनडे क्रिकेट खेळत आहेत, त्यातच वनडे क्रिकेटचे सामनेही हल्ली फार होत नाहीत, त्यामुळे दोघांना मॅच प्रॅक्टिसही मिळत नाहीये.
advertisement
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमध्ये वनडे सामन्यांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे रोहित 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत खेळण्याची शक्यता कमी आहे. दोन देशांमधल्या सीरिज या टेस्ट आणि टी-20 फॉरमॅटमध्येच होत आहेत, असं गावसकर म्हणाले. 'जर रोहित शर्मा वर्षातून फक्त 5-7 वनडे सामने खेळला तर त्याला वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी आवश्यक असलेला सराव मिळणार नाही. जर त्याचे टीममधले स्थान अनिश्चित असेल तर शुभमन गिलला तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असेल', असं वक्तव्य गावसकरांनी केलं आहे.
वाईट बातमीसाठी तयार राहा
बीसीसीआयच्या कडक सूचना असूनही, रोहित आणि कोहली देशांतर्गत क्रिकेट (विजय हजारे ट्रॉफी) खेळण्यास नाखूष आहेत. 'जर त्यांना वनडेमध्ये खेळायचे असेल तर त्यांना अधिक सराव करण्याची आवश्यकता आहे. खेळाडूपेक्षा टीम नेहमीच प्रथम येते, स्वत: रोहितलाही हे मान्य असेल. टीमला 2 वर्ष पुढचा विचार करावा लागतो. जर खेळाडू नॉन कमिटेड असेल तसंच पुढच्या 2 वर्षांसाठी आपण तयार असू का नाही, हे त्याला माहिती नसेल, तर त्याने वाईट बातमीसाठी तयार राहिलं पाहिजे', असं म्हणत गावसकरांनी मोठ्या निर्णयाचे संकेत दिले आहेत.