कोलकत्ता नाईट रायडर्सने यंदाच्या हंगामासाठी ब्लेसिंग मुझरबानीला ताफ्यात घेतले आहे. बांगलादेशी प्लेअर मुस्तफिजूर रहमानची बीसीसीआयच्या आदेशानंतर आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात आली होती.त्यानंतर आता त्याच्या बदल्यात ब्लेसिंह मुझरबानीला कोलकत्ता संघात घेण्यात आलं आहे.
खरं तर यंदाच्या पीएसएल हंगामात ब्लेसिंग मुजरबानीला इस्लामाबाद युनायटेडने 1.1 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते.पण आयपीएलमधून कोलकत्ता नाईट रायडर्सची ऑफर मिळताच त्याने पाकिस्तानी लीगला लाथ मारली आहे. इसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, ब्लेसिंग मुजरबानीने इस्लामाबाद युनायटेड संघाला पीएसएलमधून माघार घेतल्याची माहिती दिली आहे.
advertisement
दरम्यान जिओ सुपरच्या वृत्तानुसार, आयपीएलची ऑफर मिळाल्यानंतर झिम्बाबेच्या मुझरबानीने पीएसएल करारातून माघार घेतली होती. जी पीसीबीच्या मते कराराचे उल्लंघन आहे.त्यामुळे आता बोर्ड पीएसएल कराराच्या उल्लंघन टाळण्यासाठी आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कायदेशीर पावले उचलण्याच्या तयारी करत आहे. कारण अनेक खेळाडूंनी इतर स्पर्घांसाठी लीग सोडून जातात.
दरम्यान ही पहिली घटना नाही आहे. कारण याआधी गेल्या हंगामात साऊथ आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशला पेशावर झल्मीच्या डायमंड पिंकने खरेदी केले होते.पण नंतर तो दुखापतीमुळे बदली खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता.
मुजराबानीने टी20 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने सहा सामन्यांत 13 विकेट घेतल्या. त्यापैकी चार विकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीला झालेल्या दणदणीत विजयात आल्या.
