कोहलीने सध्या 84 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक 53 शतके आहेत. कोहली हा सध्या फक्त वनडे आंतरराष्ट्रीय खेळत आहे. भारताच्या 2027 च्या विश्वचषकापर्यंत कोहली अंदाजे 25-30 एकदिवसीय सामने खेळण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत काही महिन्यांत त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने स्वतः हे मान्य केले. त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आणि तिसऱ्या सामन्यात 65 रनवर तो नाबाद राहिला.
advertisement
गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले, 'का नाही?जर तो आणखी तीन वर्षे खेळला तर त्याने येथून 16 शतके झळकावली पाहिजेत. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, त्याने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतके झळकावली आहेत. पुढे जाऊन, जर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत आणखी दोन शतके झळकावली तर तो 87 पर्यंत पोहोचेल. त्यामुळे त्याला 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता खूप चांगली आहे. तो ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहे, त्यामुळे तो स्वतः याचा आनंद घेत आहे.'
भारताची पुढची वनडे सीरिज न्यूझीलंडविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होत आहे, त्यामुळे विराटला महिन्याभराचा ब्रेक आहे, पण याबद्दल गावसकरांनी चिंता व्यक्त केली आहे. 'न्यूझीलंड सीरिजआधी त्याला एक महिन्याचा ब्रेक आहे. या काही दिवसांत त्याच्या फॉर्मचे काय होते ते पाहायचे आहे. जर तो ब्रेक झाला नसता, तर मला खात्री आहे की त्याने मालिकेत दोन किंवा तीन शतके झळकावली असती', असं गावसकर म्हणाले आहेत. कोहली आता भारताच्या सर्वात मोठ्या घरगुती लिस्ट ए स्पर्धेत, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळेल. तो गेल्या दशकात पहिल्यांदाच दिल्लीकडून काही सामने खेळणार आहे.
