टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याने लाईव्ह शो दरम्यान भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. मी एका गोष्टीशी अजिबात सहमत नाही आहे.भारतीय संघ बदलाच्या काळात असताना भारतात पराभूत होते आहे,हे न पचणारं आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाऊन हरला आहे, इंग्लंडमध्ये जाऊन हारले कारण आम्ही संघ बदलाच्या काळात जातोय.त्यामुळे ही गोष्टी स्विकारता येईल,असे चेतेश्वर पुजाराने सांगितले.
advertisement
पण या संघात जो टॅलेंट आहे.तुम्ही सर्व खेळाडूंचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड काढून बघा,यशस्वी जयस्वाल,केएल राहुल,शुभमन गिल या सगळ्यांचा फर्स्ट् क्लास रेकॉर्ड इतका चांगला आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपण हारतोय तर नक्कीच काहीतरी गडबड आहे.हीच मॅच चांगल्या विकेटवर खेळले असते भारताला जिंकण्याची संधी होती. तुमच्या जिंकण्याचा टक्का कोणत्या विकेटवर जास्त आहे.अशा विकेटवर तुमचा टक्का कमी होतो. अशा विकेटवर प्रतिस्पर्धा बरोबरीत येतात.त्यामुळे तुम्ही चांगल्या विकेटवर खेळा,असे देखील पुजारा म्हणाला आहे.
भारताची ए टीम उभी करा ती पण साऊथ आफ्रिकेसमोर जिंकू शकते. कारण भारतात इतकं टॅलेंट आहे. त्यामुळे टॅलेंटची अजिबात कमी नाही आहे.भारत हा सामना हारली आहे हे न पचणार आहे,अशा शब्दात त्याने पुजाराने पराभवावर सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 159 धावांवर ऑलआऊट झाली, ज्याच्या प्रत्युत्तरात भारताने 189 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 30 धावांची लीड मिळाली होती. साऊथ अफ्रिकेने दुसऱ्या डावात 153 धावा केल्या. त्यानंतर आता टीम इंडिया 93 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यानंतर आता साऊथ अफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सिरीजमध्ये पाहुण्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारत: यशस्वी जायसवाल, केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविंद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
साउथ अफ्रीका: एडेन मार्करम, रयान रिकेल्टन, वियान मुल्डर, तेंबा बावुमा (कॅप्टन), टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरिन (विकेटकीपर), साइमन हार्मर, मार्को जानसन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.
