वजन वाढलं म्हणून सुरू केला व्यायाम
मूळचे छत्रपती संभाजीनगर शहरांमधील नितीन घोरपडे हे व्यावसायिक आहेत. त्यांना पहिल्यापासूनच व्यायामाची आवड होती. मात्र मध्यंतरी त्यांचं वजन खूप वाढलं. त्यामुळे त्यांनी परत व्यायामाला सुरुवात केली. यामध्ये ते सायकलिंग वगैरे करत होते. हे करत असतानाच त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. पुढे जागतिक ट्रायथलॉन स्पर्धांमध्येही ते भाग घेऊ लागले.
advertisement
Inspirational Story : महाराष्ट्राच्या पोलिसाचा नादच खुळा; थेट युरोप गाजवलं
सलग सहावेळा आयर्नमॅन
नितीन घोरपडे यांनी सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी सलग सहा वेळा ही स्पर्धा जिंकली. यामध्ये त्यांनी चार फुल स्पर्धा व दोन हाफ आयर्न मॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. खूप मोठी मेहनत आणि जिद्दीच्या बळावरच ही स्पर्धा जिंकता येऊ शकते. त्यामुळे नितीन यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जगातील सर्वात अवघड स्पर्धा
आयर्नमॅन स्पर्धेमध्ये तीन खेळांचा समावेश असतो. तिच्यामध्ये स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग हे तीन क्रीडाप्रकार असतात. 17 तासाच्या आत ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यामध्ये स्विमिंग 3.8 किलोमीटर, रनिंग 180 किलोमीटर, सायकलिंग 42 किलोमीटर एवढे अंतर पार करायचे असते. ही स्पर्धा पूर्ण करताना अनेक अडचणी येतात. आपल्या देशातील वातावरण आणि स्पर्धेच्या देशामधील वातावरण यामध्ये बराचसा फरक असतो. हवामानात बदल झाल्यामुळे अडचण येते. त्यामुळे ही स्पर्धा जगातील सर्वात अवघड मानली जाते.
सडक्या थर्माकोलवर बसून शाळेला जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ, Video पाहून वाटेल भीती
व्यायामामुळं मिळालं यश
माझं वजन खूप वाढलं होतं. त्यामुळं मध्यंतरी मी व्यायामाकडे आलो. दररोज व्यायाम करायला लागलो. यामध्ये मी सायकलिंग, धावणे आणि पोहणे या सगळ्या गोष्टी करत होतो. हे करत असतानाच स्पर्धेकडे वळलो. सातत्यपूर्ण व्यायाम आणि सरावामुळे सलग सहा वेळा आयर्नमॅन स्पर्धा जिंकली. याचा मला खूप खूप आनंद व अभिमान वाटत आहे, असे नितीन घोरपडे सांगतात.