आम्ही अर्धा तास टीव्ही बंद केला... - फडणवीस
टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. अनेकदा काही मोजकेच संघ वर्ल्ड कप घेऊन जायचे, पण यावेळी वर्ल्ड कपला नवा विनर मिळाला आहे. आमचे सर्वांची नजर फायनलवर लागली होती. सेमीफायनलमध्ये सर्वांनी चांगली कामगिरी केली. जेमिमाने जशी सेमीफायनल मॅच काढली, सेंच्युरी केली. त्यामुळे फायनल आपल्याला पहायला मिळाली. फायनलमध्ये देखील उत्तम कामगिरी केली होती. साऊथ अफ्रिकेची ओपनर जेव्हा सेंच्युरीच्या जवळ होती, तेव्हा आम्ही अर्धा तास टीव्ही बंद केला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावेळी खेळाडूंना हसू आवरलं नाही तर अजित पवार देखील गालातल्या गालात हसले. पण नंतर अर्धा तासाने टीव्ही लावल्यानंतर चित्र बदलेलं होतं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
advertisement
अमोल मुजुमदार यांचं कौतूक
सुरूवातीच्या मॅचमध्ये पराभवानंतर पुन्हा संघाने कमबॅक केलं. कुठल्या ना कुठल्या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडू चमकत होती. प्रत्येकाची महत्त्वाची भूमिका होती, असं फडणवीस म्हणाले. त्यावेळी फडणवीसांनी अमोल मुजुमदार यांचं कौतूक देखील केलं. टीममध्ये बॉन्डिंग चांगली होती. टीममध्ये वातावरण चांगलं होतं म्हणूनच टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आलाय. त्यावेळी फडणवीस यांनी जय शहा यांचे आभार व्यक्त केले.
जेमिमा स्मृतीला रील शिकवते...
जय शहा यांनी महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेलं आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने अतिशय चांगली भूमिका घेतली अन् वुमेन्स क्रिकेटला चांगले दिवस दाखवले आहेत. स्मृती टीम इंडियाची आयकॉनिक प्लेयर आहे. लवकर ती 10000 रन पूर्ण करेल. जेमिमाचे बॅटिंग आणि रील देखील चांगले असतात. जेमिमा सर्वांना प्रोत्साहित करते. जेमिमा स्मृतीला शिकवत असते की, डान्स कसा करायचा, असं म्हणत सभागृहात हशा पिकला. राधाची स्टोरी इन्सपायरिंग स्टोरी आहे. हाडाची खेळाडू म्हणून तिने नाव कमावलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंका
डोमेस्टिक क्रिकेटसाठी तुम्ही जो रेकॉर्ड केला आहे, तो नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. परंतू तुम्ही सध्या व्हायरल होत आहात. मी तुम्हाला आजच भाकित करतो, येत्या काही दिवसात तुमच्यावर नक्की एखादा सिनेमा निघेल, अशी भविष्यवाणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. खूप जास्त स्पर्धा असताना प्रशिक्षकाची जबाबदारी महत्त्वाची असते. आपल्याला ऑलिम्पिकमध्ये नक्कीच मोठी संधी आहे. आपली टीम नक्कीच गोल्ड मेडेल जिंकाल, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
स्मृतीला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा
दरम्यान, माजी वुमेन्स क्रिकेटर्सने तुम्हाला सपोर्ट केला. त्यांचंही कौतूक केलं पाहिजे. तुमच्यापासून खूप मुली प्रोत्साहित होतील आणि क्रिकेटचा प्रवास सुरू करतील. तुम्हा तिघींना खूप खूप शुभेच्छा... स्मृतीला पुढील भविष्यासाठी देखील शुभेच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. फडणवीसांनी स्मृतीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्यात की काय? असा सवाल विचारला जातोय.
