TRENDING:

Comrades Marathon: 90 KM अंतर 12 तासांचा संघर्ष, जगातील सर्वात कठीण ‘कॉम्रेड्स’मॅरेथॉन का आहे खास?

Last Updated:

Comrades Marathon: जगातील सर्वात जुनी, सर्वात कठिण ट्रॅकपैकी एक अशी अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे दक्षिण आफ्रीकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉन आहे. यंदा 416 भारतीयांनी यामध्ये भाग घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मॅरेथॉन हा शब्द आजकाल भारतात इतका ट्रेंड झालाय, की अगदी लहान मुलांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळेच धावतात आणि सोशल मीडियावर मॅरेथॉन कल्चरला प्रमोटही करतात. भारतात दर आठवड्याला कुठे ना कुठे 10 ते 21 किलोमीटरची मॅरेथॉन देखील होत असते. एकट्या मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षी तब्बल 30 हजाराहून अधिक लोक सहभागी होतात. जशी भारतात मुंबई मॅरेथॉन गाजते, तशी जगात एक मॅरेथॉन आहे, जिथं धावण्याचं स्वप्न प्रत्येक प्रोफेशनल धावपटू पाहत असतो, ती मॅरेथॉन म्हणजे दक्षिण आफ्रीकेतील डरबन ते पीटरमैरीट्जबर्ग या दोन शहरात होणारी कॉम्रेड्स मॅरेथॉन होय.
Comrades Marathon: जागतील सर्वात कठीण मॅरेथॉन, ‘कॉम्रेड्स’मध्ये धावले 416 भारतीय, का आहे खास?
Comrades Marathon: जागतील सर्वात कठीण मॅरेथॉन, ‘कॉम्रेड्स’मध्ये धावले 416 भारतीय, का आहे खास?
advertisement

जगातील सर्वात जुनी, सर्वात कठिण ट्रॅकपैकी एक अशी अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे दक्षिण आफ्रीकेतील ही मॅरेथॉन आहे. 90 किलोमीटरच्या अंतरातील या मॅरेथॉनचा ट्रॅक अवघड मानला जातो. चांगल्यात चांगल्या धावपटूचाही कस लागतो. या मॅरेथॉनमध्ये यंदा 20 हजार 500 धावपटूंनी सहभाग घेतला. त्यातले 90 टक्के स्थानिक म्हणजेच दक्षिण आफ्रिकन होते. भारताच्या 416 धावपटूंनी सहभाग घेतला. त्यातल्या तब्बल 57 महिला होत्या. विशेष म्हणजे सर्व महिलांनी पारंपरिक पद्धतीनं साडी नेसूनच देशाचं प्रतिनिधित्त्व केलं.

advertisement

Yoga Day 2025: ऑफिसमधून फक्त 2 मिनिटे काढा अन् ही योगासने करा, उत्तम आरोग्यासाठी सोपा उपाय

कॉमरेड्स मॅरेथॉन आणि महात्मा गांधींची आठवण

दक्षिण आफ्रिकेतील या मॅरेथॉनला कॅाम्रेड्स मॅरेथॉन म्हटलं जातं. याची सुरुवात 104 वर्ष आधी म्हणजेच 1921 मध्ये झाली. यंदाचं मॅरेथॉनचं हे 98 वं वर्ष होतं. दुसरं महायुद्ध, कोरोना महामारीचा काळ वगळता दरवर्षी ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. आता भारताशी या मॅरेथॉनचा जवळचा संबंध आहे. ही मॅरेथॉन महात्मा गांधींना ट्रेनमधून उतरवून देण्यात आलं होतं, आणि जिथं त्यांनी पहिला सत्याग्रह केला होता. त्याच शहरातल्या मॅरेथॉनमध्ये पारंपरिक वेशभूषेत भारतीय धावपटू सहभागी झाले होते.

advertisement

कॉम्रेड मॅरेथॉन धावणारे धावपटू

कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये 90 किलोमीटरचं अंतर 12 तासांच्या आत पूर्ण करावं लागतं. त्यासाठी धावपटूंना खास तयारी करावी लागते. आफ्रीकेतील डरबन ते पीटरमैरीट्जबर्ग या दोन शहरांदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत हजारो धावपटू सहभागी होतात. यंदा देखील काही भारतीयांनी ही मॅरेथॉन गाजवली.

  1. प्रवीण कुमार तियोटिया हे 26/11 चे वीर आणि माजी मरीन कमांडो आहेत. ज्यांना ताज हल्ल्यात गोळ्या लागल्या होत्या. त्यांनी आयर्नमॅन आणि खारदुंगला पार करत ही रेस यशस्वीरित्या पूर्ण केली.
  2. advertisement

  3. ठाण्यातील सुरेश वेलणकर हे सध्या 58 वर्षांचे आहेत. त्यांचा एका अपघातात एक हात लहानपणीचा गेला होता. त्यांनी एका हातासोबत धावत ही रेस पूर्ण केली. त्यांच्या नावावर 550 किमी मुंबई-गोवा सायकल राईडसह अनेक मॅरेथॉन रेकॉर्ड देखील आहेत.
  4. पुण्यातील एसीपी साईनाथ ठोंबरे हे महाराष्ट्र पोलिसांपैकी एक आहेत. त्यांनी कामाच्या व्यापातून वेळ काढून तयारी केली. “कॉमरेड्स मॅरेथॉन तुम्हाला शिस्तबद्ध जीवन जगायला शिकवते,” असं त्यांचं म्हणणं आहे.
  5. advertisement

  6. बृह्नमुंबई महापालिकेचे अधिकारी विश्वास मोटे हे देखील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये धावले. त्यांनी पूर्वी आयर्नमॅन पूर्ण केलेले आहे.
  7. जळगावच्या विद्या बेंदले 65 वर्षांच्या भारतातील सर्वात जेष्ठ महिला धावपटू आहेत. त्यांनी केवळ एक वर्ष आधी या रेसमध्ये भाग घेण्याचं ठरवलं आणि सातत्याने सराव करून ही स्पर्धा पूर्ण केली.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Comrades Marathon: 90 KM अंतर 12 तासांचा संघर्ष, जगातील सर्वात कठीण ‘कॉम्रेड्स’मॅरेथॉन का आहे खास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल