Yoga Day 2025: ऑफिसमधून फक्त 2 मिनिटे काढा अन् ही योगासने करा, उत्तम आरोग्यासाठी सोपा उपाय

Last Updated:

Yoga Day 2025: सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांना वेळच मिळत नाही. तेव्हा आपण ऑफीसमध्ये काम करताना फक्त 2 मिनिटे काढून हे लाभदायी योगासने करू शकता.

+
Yoga

Yoga Day 2025: ऑफिसमधून फक्त 2 मिनिटे काढा अन् ही योगासने करा, उत्तम आरोग्यासाठी सोपा उपाय

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढणं अत्यंत कठीण झालं आहे. दिवसाचे 8-10 तास ऑफिसच्या खुर्चीत बसून काम करताना पाठदुखी, मानदुखी, थकवा, डोकेदुखी, मानसिक तणाव अशा विविध समस्या उद्भवत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग अभ्यासक अवनी पडवळ यांनी ऑफीसमध्ये केवळ 2 ते 5 मिनिटांत करता येणारी काही सोपी आणि प्रभावी प्राणायाम व योगासने सांगितली आहेत.
ऑफिसमध्ये सहज करता येणारी योगासने आणि प्राणायाम
  1. सुप्त ताडासन (Supta Tadasana): शरीराला लांबवते, मेरुदंडात लवचिकता वाढवते. थकवा कमी करते, शरीराला ताजेतवाने ठेवते.2. कटी वक्रासन (Kati Vakrasana): कमरेचा वळण वाढवते. पाठदुखी व कंबरदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त
3. सेतू बंधासन (Setu Bandhasana): मणक्याला बळकटी देते. मानसिक तणाव कमी करतो.
4. भुजंगासन (Bhujangasana): पाठीच्या मणक्याला लवचिक बनवते. छाती व फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
advertisement
5. वक्रासन (Vakrasana): पचनसंस्थेस चालना देते. शरीरातील ऊर्जा जागृत करते.
6. कपालभाती प्राणायाम (Kapalbhati): फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते. मानसिक स्पष्टता, एकाग्रता वाढवते.
कधी करू नये ही आसने?
मणक्याचे आजार, स्नायूंना दुखापत, मायग्रेन, व्हर्टिगो, हाय बीपी, गर्भधारणा, सर्जरीनंतरचा कालावधी, हर्निया, कंबरदुखी, गॅस्ट्रिक किंवा पचनाचे विकार आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी ही आसने करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः कपालभाती करताना, हाय बीपी, एपिलेप्सी, ग्लुकोमा, किंवा मासिक पाळीच्या काळात टाळावे.
advertisement
योग ही केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त अशी संपूर्ण प्रणाली आहे. थोड्या वेळात मोठा परिणाम देणाऱ्या या योगासनांचा समावेश करून, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या/हेल्थ/
Yoga Day 2025: ऑफिसमधून फक्त 2 मिनिटे काढा अन् ही योगासने करा, उत्तम आरोग्यासाठी सोपा उपाय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement