Jemimah Rodrigues : 'टीममधून बाहेर केलं, रोज रडले...', वादळी शतकानंतर जेमिमा भावुक, प्रेक्षकांचे डोळेही पाणावले
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 339 रनचं आव्हान भारताने 48.3 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं.
नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 339 रनचं आव्हान भारताने 48.3 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात नॉक आऊट सामन्यातला कोणत्याही टीमचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. जेमिमा रॉड्रिग्ज भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली. जेमिमा रॉड्रिग्जने 134 बॉलमध्ये नाबाद 127 रन केले. जेमिमाला कर्णधार हरमनप्रीत कौरनेही साथ दिली. हरमनप्रीतने 88 बॉलमध्ये 89 रन केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मॅच जिंकवणाऱ्या खेळीनंतर जेमिमा भावुक झाली. आज मला खूप भीती वाटत होती. मला टीममधून काढलं गेलं होतं, संपूर्ण स्पर्धेत मी रोज रडायचे, पण देवाने मला पुढे नेलं, असं जेमिमा म्हणाली आहे.
काय म्हणाली जेमिमा?
'सगळ्यात आधी मी येशूचे आभार मानते, कारण मी हे स्वतः करू शकले नाही. त्याने मला आज साथ दिली. मी माझ्या आईचे, वडिलांचे, माझ्या प्रशिक्षकाचे आणि या काळात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते. मागचे चार महिने खूप कठीण होते, पण हे स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. मी पाचव्या क्रमांकावरच बॅटिंगला जाणार होते, यानंतर मी अंघोळीला गेले. तेव्हा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्याचा निर्णय झाला. टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी मला तिथे राहणं गरजेचं होतं. आजचा दिवस 50 किंवा 100 रनबद्दल नव्हता, तर भारताला जिंकवण्याबद्दल होता, म्हणून मी शतकानंतर सेलिब्रेशन केलं नाही. टीममधल्या प्रत्येकाने मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे, मी एकटी या सगळ्याचं श्रेय घेऊ शकत नाही. नवी मुंबई कायमच माझ्यासाठी खास राहिलं आहे, यापेक्षा चांगला निर्णय आला नसता. ज्यांनी टीमसाठी जल्लोष केला, त्या सगळ्यांचे आभार मी मानते', असं वक्तव्य जेमिमाने केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 11:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jemimah Rodrigues : 'टीममधून बाहेर केलं, रोज रडले...', वादळी शतकानंतर जेमिमा भावुक, प्रेक्षकांचे डोळेही पाणावले


