कृतिकाची पोस्ट
बुधवारी कृतिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले, ज्यात कृतिका आणि गौरव दोन्ही दिसत आहेत. फोटोंमध्ये दोघंही एकत्र ब्रेकफास्ट करताना आणि कॉफी पिताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना कृतिकाने फक्त 'ब्रेकफास्ट विथ' एवढंच लिहिलं आहे. गौरव कपूर याचा युट्युबवर ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स हा शो आहे, ज्यात तो क्रिकेटपटूंची मुलाखत घेतो. या फोटोंमध्ये कृतिका आणि गौरवचा एक सेल्फी देखील आहे. तसंच एक व्हिडिओही आहे, ज्यात दोघांच्या कॉफी मग वर बेबी लिहिलं आहे.
advertisement
बऱ्याच काळापासून चर्चा
कृतिका आणि गौरव यांच्या रिलेशनशीपची चर्चा सोशल मीडियावर मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मुंबईमध्ये या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. या दोघांच्या अफेयरची चर्चा बॉलिवूडमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. या दोघांना वांद्र्याच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही अनेकदा पाहिलं गेलं होतं, पण दोघांनी त्यांच्या रिलेशनशीपबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता कृतिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे.
कोण आहे कृतिका कामरा?
कृतिकाने तिच्या करिअरची सुरूवात टीव्हीमधून केली. 'कितनी मोहब्बत है', 'कुछ तो लोग कहेंगे' आणि 'रिपोर्टर्स' यासारख्या हिट शोमध्ये कृतिका दिसली होती, ज्यामुळे तिला प्रसिद्धीही मिळाली. यानंतर तिने वेब सीरिज आणि चित्रपटाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं. तांडव (2021), बंबई मेरी जान (2023) आणि भीड (2023) या वेब सीरिजमध्ये कृतिकाने काम केलं आहे. कृतिका मूळची उत्तर प्रदेशच्या बरेलीची असून तिने नवी दिल्लीच्या एनआयएफटीमध्ये फॅशन कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आहे.
