TRENDING:

Asia Cup Final : जखमी पुणेकराने रोहित शर्माला जिंकवून दिला होता 'आशिया कप', 28 सप्टेंबरची ती थ्रिलर रात्र! पाहा Video

Last Updated:

Cricket On This Day : क्रिकेटच्या या अनोख्या 'क्रिकेट - ऑन दिस डे' सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. 28 सप्टेंबर 2018 ला क्रिकेटचा एक अनोखा किस्सा घडला होता. सात वर्षापूर्वी याच दिवशी टीम इंडियाने आशिया कपवर नाव कोरलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
28 सप्टेंबर 2018... Asia Cup Final च्या इतिहासातील सर्वात थरारक मॅच! दुबईच्या मैदानात अखेरच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार, याचा अंदाज लावणं अशक्य झालं होतं. फायनल सामना सुरू होता. शेवटची ओव्हर... सहा बॉलमध्ये भारताला सहा धावांची गरज होती अन् फक्त तीन विकेट्स हातात. स्ट्राईकवर होता चायना मॅन कुलदीप यादव... तर दुसरीकडे जखमी पुणेकर... सामना रोमांचक स्थितीत आला अन् सर्वांच्या हृद्याचे ठोके वाढले.
Cricket On This Day 28 September how kedar Jadhav win Asia Cup Final
Cricket On This Day 28 September how kedar Jadhav win Asia Cup Final
advertisement

लिटन दास वादळासारखा मैदानात

टॉस जिंकून भारताने बॉलिंग निवडल्यानंतर बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास वादळासारखा मैदानात उतरला. त्याने 117 बॉलमध्ये 12 फोर आणि 2 सिक्स मारत 121 धावांची अविस्मरणीय शतकी खेळी केली. लिटन दास आणि मेहेदी हसन मिराझ यांनी 120 धावांची स्फोटक सलामी देत भारतीय कॅम्पमध्ये शांतता पसरवली. बांगलादेश 300 पार करेल असे वाटत असतानाच, कुलदीप यादव (3/45) आणि गोल्डन आर्म केदार जाधव (2/41) यांनी डाव फिरवला! भारतीय स्पिनर्सच्या जाळ्यात अडकत बांगलादेशचा संघ 120/0 वरून पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि 48.3 ओव्हर्समध्ये अवघ्या 222 धावांत ऑल आऊट झाला.

advertisement

केदार जाधवने मैदान सोडलं...

223 धावांचे सोपे वाटणारे लक्ष्य भारतीय फलंदाजांसाठी अग्निपरीक्षा ठरलं. कर्णधार रोहित शर्माने (48 धावा, 3३ सिक्ससह) आणि दिनेश कार्तिकने (37) स्कोरबोर्ड सांभाळला. पण, मधल्या ओव्हर्समध्ये धवन, रायडू, रोहित, कार्तिक आणि धोनी हे सगळे महत्त्वाचे गडी पटापट माघारी परतले. 160/5 अशी अवस्था झाल्यानंतर भारतीय चाहत्यांचे हृदय जोरजोरात धडधडू लागलं. यादरम्यान, भारताला सर्वात मोठा धक्का बसला. दुखापतीमुळे केदार जाधवला मैदान सोडावं लागलं आणि तो रिटायर्ड हर्ट झाला.

advertisement

48 व्या ओव्हरमध्ये उलटफेर

पण, भारताने हार मानली नाही! रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी मोलाची भागीदारी केली. भुवीने एक सिक्स मारून मॅचमध्ये जीव ओतला. मात्र, 48 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर भुवनेश्वर बाद झाला आणि मॅच पुन्हा बांगलादेशच्या हातात गेली. फक्त 11 धावांची गरज असताना, दुखापतीमुळे लंगडत असलेला केदार जाधव क्रूर नियतीशी लढत मैदानात परतला. शेवटच्या ओव्हरमध्ये महमुदुल्लाच्या बॉलिंगवर भारताला जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता होती.

advertisement

अन् केदार जाधवने आशिया कप जिंकवला

50 व्या ओव्हरचा अखेरचा बॉल! भारताला फक्त 1 रन हवा होता. केदार जाधव स्ट्राइकवर! महमुदुल्लाने टाकलेला बॉल... जाधवच्या पॅडला लागला आणि फाइन लेगच्या दिशेने धावला. लेग बायची ती 1 धाव! केदार जाधवने दुखापतग्रस्त होऊनही मैदानात परत येऊन अखेरच्या बॉलवर विजय निश्चित केला आणि भारताला Asia Cup Final मध्ये अविश्वसनीय विजय मिळवून दिला!

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Final : जखमी पुणेकराने रोहित शर्माला जिंकवून दिला होता 'आशिया कप', 28 सप्टेंबरची ती थ्रिलर रात्र! पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल