सगळेच केस का वाढवत आहेत?
प्रॅक्टिस सेशन दरम्यान विक्रम राठोड यांनी टीममधील खेळाडूंच्या वाढलेल्या केसांवरून प्रश्न उपस्थित केला "सगळेच जण केस वाढवत आहेत, काही गेम किंवा चॅलेंज सुरू आहे का?" असा मिश्किल प्रश्न राठोड यांनी विचारला. त्यावर ऋतुराजने उत्तर दिलं. राठोड यांच्या प्रश्नावर ऋतुराज गायकवाडने मजेशीर उत्तर दिलं.
advertisement
केस गळण्याची भीती
"जे प्लेयर्स 28 ते 29 वयोगटाच्या पुढे गेले आहेत, तेच सध्या केस वाढवत आहेत," असं ऋतुराज म्हणाला. वाढत्या वयानुसार केस गळण्याची भीती असल्यानेच अनेकजण सध्या लांब केस ठेवण्याचा ट्रेंड फॉलो करत असल्याचं ऋतुराज गायकवाडने यावेळी सांगितलं.
राखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय
"आम्हाला केस जाण्याची (गळण्याची) काळजी वाटतेय, म्हणून आम्ही ते राखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय.", असं ऋतुराज म्हणाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या अन् दोघंही आपापल्या मार्गाला लागले. दोघांमधील हा संवाद ऐकून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
IPL 2026 : तब्बल 18 वर्षानंतर धोनी पर्वाचा 'द एन्ड', स्वत: CSK ने केली घोषणा, पोस्ट चर्चेत!
एम.एस. धोनी आऊट
दरम्यान, स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे एम.एस. धोनी किमान दोन आठवड्यांसाठी संघाबाहेर राहणार असल्याने, संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करतील आणि संघाच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावतील. धोनी संघासोबत गुवाहाटीला गेला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत सॅमसन आणि गायकवाड यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या असतील.
