TRENDING:

IND VS ENG : इंग्लंडने 4 वर्षात टीम इंडियाला 2 वेळा दिला मोठा धक्का, विसरता न येणारे पराभव

Last Updated:

आयसीसीच्या स्पर्धांत गेल्या ४ वर्षात इंग्लंडकडून भारताला मिळालेले दोन पराभव जिव्हारी लागणारे आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 30 सप्टेंबर : भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपचे काउंटडाउन सुरू झाले असून अवघ्या पाच दिवसांनी पहिला सामना होणार आहे. दरम्यान, वर्ल्ड कपमधील सराव सामने सुरू असून आज भारत आणि इंग्लंड यांच्यात लढत होत आहे. वर्ल्ड कपआधी सराव सामन्यात आपली ताकद दाखवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा संघ बराच प्रवास करून गुवाहाटीत पोहोचला आहे. त्यांनी भारतीय वातावरणाशी लवकरात लवकर जुळवून घ्यावं लागणार आहे.
News18
News18
advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या काही वर्षात बरेचसे सामने झाले. दोन्ही संघ आमने-सामने येतात तेव्हा रोमहर्षक लढती बघायला मिळाल्या आहेत. आय़सीसी टूर्नामेंटमध्ये इंग्लंडने गेल्या काही वर्षात भारताला तगडं आव्हान दिलंय. तर गेल्या दोन स्पर्धांमध्ये कधी न विसरता येणारे पराभवही भारताच्या पदरी पडले आहेत.

World Cup 2023 : सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात, विराट कोहली वर्ल्ड कपमध्ये घड़वणार इतिहास?

advertisement

आयसीसीच्या स्पर्धांत गेल्या ४ वर्षात इंग्लंडकडून भारताला मिळालेले दोन पराभव जिव्हारी लागले आहेत. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडशी सामना झाला. इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची त्या सामन्यात धुलाई करत १० विकेटने विजय मिळवला होता. यानंतर फायनलमध्ये धडक मारत त्यांनी विजेतेपदही पटकावलं.

याआधीचा एकदिवसीय वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये २०१९ ला झाला होता. तेव्हा इंग्लंड हा एकमेव संघ होता ज्यांनी भारताला साखळी फेरीत हरवलं होतं. २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध लीग सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३३७ धावा केल्या होत्या. या सामन्यात जॉनी बेअरस्टोने वादळी शतक झळकावलेलं तर बेन स्टोक्सने अर्धशतक केलं होतं.

advertisement

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारताने दोन फिरकीपटू खेळवले होते. मात्र दोघांची इतकी धुलाई झाली की भारताने त्यानंतर दोघांना एकत्र कमीच संधी दिली. यावेळी तर चहल संघातून बाहेर आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कुलदीप यादवला संघात घेतलं आहे. त्याने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. वर्षभरात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. यावेळी कुलदीप भारतासाठी ट्रंप कार्ड ठरेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS ENG : इंग्लंडने 4 वर्षात टीम इंडियाला 2 वेळा दिला मोठा धक्का, विसरता न येणारे पराभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल