World Cup 2023 : सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात, विराट कोहली वर्ल्ड कपमध्ये घड़वणार इतिहास?

Last Updated:
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. तब्बल 11 वर्षांनी भारतात वर्ल्ड कप खेळवला जाणार असून यासाठी सर्वच क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीकडे सचिन तेंडुलकरचा एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
1/6
5 सप्टेंबर पासून भारतात आयसीसी वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात होणार आहे. यात जगभरातील 10 टीम्स एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात सामना खेळून वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. भारताच्या विविध 10 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळले जाणार असून शेवटचा सामना हा 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.

advertisement
2/6
वर्ल्ड कप 2023 साठी भारताच्या टीमची घोषणा करण्यात आली असून यात रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मो. सिराज, मो. शमी आणि शार्दुल ठाकुर इत्यादी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

3/6
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध दमदार शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही विराट कोहलीचे 76 वे शतक होते. तर वनडे क्रिकेटमधील विराटाचे हे 47 वे शतक होते.

4/6
विराट कोहलीने कोलंबोमध्ये पाकिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली होती. विराटने 47 शतकांचा टप्पा केवळ 267 इनिंगमध्ये पार केला असून याबाबतीतही त्याने सचिनला मागे टाकले. सचिनने वनडेत 435 डावात ही कामगिरी केली होती.

5/6
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वांदे क्रिकेटमध्ये 49 शतक ठोकली आहेत. सचिन तेंडुलकरने 463 वनडे सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. विराट कोहली सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतक ठोकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी साधण्या पासून केवळ 2 तर सचिनचा हा रेकॉर्ड मोडण्यापासून केवळ 3 शतकं दूर आहे.

6/6
विराट कोहलीचा सध्याचा जबरदस्त फॉर्म पाहता तो यंदाच्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये सचिनचा हा रेकॉर्ड मोडू शकतो असे म्हंटले जात आहे. तेव्हा विराट कोहलीला वर्ल्ड कप,मध्ये शतकीय कामगिरी करण्यात यश येत का? हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement