advertisement

माझ्या डोळ्यासमोरच तिला...! फरमानशी लग्न करणाऱ्या मोनालिसासोबत नको ते घडलं; वडिलांचा मोठा गौप्यस्फोट

Last Updated:

Monalisa Farman Wedding : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने आपले वडील आपलं लग्न दुसऱ्याशी लावून देत होते, आपलं फरमानवर प्रेम होते, म्हणून आम्ही लग्न केलं असं सांगितलं. आता तिच्या वडिलांची प्रतिक्रिया आली आहे. ज्यांनी त्यांच्या मुलीसोबत काय काय घडलं ते सांगितलं आहे.

News18
News18
कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आले. मल्याळम अभिनेता फरमान खानशी लग्न करून तिने सगळ्यांना धक्का दिला. अनेकजण या लग्नाला लव्ह जिहाद म्हणत आहेत. पण या कपलने आपण एकमेकांवर प्रेम करत असून लव्ह जिहाद नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आता मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी मोनालिसासोबत नको तेच घडल्याचा आरोप केला आहे.
मोनालिसा आणि फरमान यांनी केरळच्या एका मंदिरात लग्न केलं. आपण एकमेकांवर प्रेम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. फरमानने मोनालिसानेच आपल्याला प्रपोज केलं, असं सांगितलं. तसंच मोनालिसाचं कुटुंब तिचं लग्न गावातील दुसऱ्या पुरुषासोबत लावून देत होते, त्यामुळे त्यांनी लग्न केल्याचं ते म्हणाले. पण मोनालिसाच्या वडिलांनी मात्र आपल्या मुलीला फसवलं, तिच्यासोबत काहीतरी केलं असा आरोप केला आहे.
advertisement
मोनालिसाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार तेसुद्धा मोनालिसासोबत केरळमध्येच होते. नेमकं काय काय घडलं ते सगळं त्यांनी सांगितलं आहे.
वडिलांनी सांगितलेली मोनालिसाची 'द केरल' स्टोरी
जयसिंग म्हणाले, "मोनालिसा आणि मला एक महिन्यापासून फोन येत होता. आम्हाला एक्टिंग शिकवतील आणि एक गाणंही तयार करतील असं आम्हाला सांगण्यात आलं. म्हणून तिथं काय कसं आहे हे पाहण्यासाठी मी आणि मोनालिसा केरळला गेलो. तिथं एक्टिंग चांगली शिकवतात, कथ्थकही कमी किमतीत शिकवतात हे आम्हाला कळलं. म्हणून तिथं दोन दिवस राहून काय होतं पाहुयात असं ठरवलं. आता अभिनय शिकण्यासाठी तिथं राहायचं म्हणजे घर हवं, त्याबाबत मी विचारलं, तर ते देण्याचीही त्यांनी तयारी दाखवली"
advertisement
माझ्या मुलीला फसवलं, माझ्या डोळ्यासमोर त्यांनी तिला...
"आम्हाला तिथं 4-5 दिवस झाले. त्यावेळी मला घरून माझी आई असल्याचे फोन येते होते. म्हणून मी त्यांना मला घरी जाण्याच्या तिकिटीची व्यवस्था करून द्यायला सांगितलं. आम्ही एअरपोर्टकडे जायला निघालो तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला गाडी थांबवली आणि मोनालिसाला पोलीस स्टेशनला नेलं. पण त्यांनी मला आत येऊ दिलं नाही. कित्येक तास बाहेर ठेवलं", असं त्यांनी सांगितलं.
advertisement
मोनालिसाच्या वडिलांनी याचं कारणही त्यांना विचारलं. जयसिंह म्हणाले, "त्यांना याचं कारण विचारलं तेव्हा ते तुम्ही मोनालिसाचं जबरदस्ती लग्न लावत आहात, तिला तुमच्यासोबत यायचं नाही असं सांगितलं. मोनालिसानेही मला तिथून जायला सांगितलं. इथेच राहून अभिनय, नृत्य आणि चित्रपट शिकेन असं ती म्हणाली. मला दोन मिनिटंही न सोडणारी माझी मुलगी. मला वाटतं माझ्या मुलीला फसवलं आहे किंवा तिच्यासोबत काहीतरी केलं. हा जादूटोणा असू शकतो. त्यांनी माझ्या डोळ्यासमोर मोनालिसाला पळवून नेलं.  असं काय झालं की त्यांनी मला तिथून पळवून लावलं आणि माझ्या मुलीला घेऊन गेले?"
advertisement
'मला मरावंसं वाटलं...'
"मुस्लिम मुलाशी लग्न करणं चुकीचं आहे. मला आयुष्य संपवावं असं वाटत होतं. पण माझा मुलगा म्हणला, 'बाबा माझ्यासाठी जगा'. पण आता मोनालिसासारख्या मुलीचं मी काय करावं?", असा प्रश्न त्यांना पडला आहे.
"मला माझ्या मुलीला एकटं सोडायचं नव्हतं. मी माझ्या मुलीसाठी खूप मेहनत घेतली. मला खूप वाईट वाटतंय.  मोनालिसाने सांगितलं की ती अभिनय शिकून परत येईल. ती कधी परत येते, मी तिची वाट पाहत आहे. पण लग्न पाहून असं वाटत नाही की ती येईल", अशी खंत 'आज तक'शी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
माझ्या डोळ्यासमोरच तिला...! फरमानशी लग्न करणाऱ्या मोनालिसासोबत नको ते घडलं; वडिलांचा मोठा गौप्यस्फोट
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement