हार्दिकसोबत सेल्फी न मिळाल्याने निराश झालेल्या चाहत्याने हार्दिकला 'खड्ड्यात जा', असे उद्गार काढले. या चाहत्याचा चेहरा कॅमेरामध्ये कैद झाला नसला, तरी त्याच्या वर्तणुकीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे.
हार्दिकने दिली नाही कोणतीच प्रतिक्रिया
हार्दिक पांड्याने त्याच्यासोबत झालेल्या गैरवर्तनानंतरही संयम बाळगला. शिवीगाळ करणाऱ्या चाहत्याकडे हार्दिकने दुर्लक्ष केलं, तसंच कोणतीही प्रतिक्रिया न देता हार्दिक गाडीत बसला. चाहत्याने हार्दिकसोबत गैरवर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये परततानाही, चाहत्यांनी त्याच्यासोबत सर्व मर्यादा ओलांडल्या. स्टेडियममध्ये त्याला ट्रोल करण्यात आलं आणि मैदानाबाहेरही वाईट वागणूक देण्यात आली, परंतु हार्दिकने नेहमीच संयम दाखवला आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी हार्दिकची तयारी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर, हार्दिक पांड्या आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसह टी-20 वर्ल्ड कपचीही तयारी करत आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे आणि हार्दिक भारतीय टीममधील मुख्य ऑलराऊंडर आहे. न्यूझीलंडविरुद्धची 5 सामन्यांची टी-20 सीरिज जानेवारीमध्ये खेळवली जाईल, तर टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
