खोल समुद्रात फेकून दिलं पाहिजे - गंभीर
एक देश म्हणून आणि आम्ही व्यक्ती म्हणून, कधीही मालिका पराभव साजरा करत नाही, असं गौतम गंभीर म्हणाला. खेळाडूंच्या नेतृत्वावर दबावाखाली असलेल्या खेळाडूची चाचणी घेतल्यानं त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन होतं असं मत गंभीरने व्यक्त केलं आहे. गंभीरने यावेळी शुभमन गिलची कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्याचं उदाहरण दिलं. खेळाडूंना खोल समुद्रात फेकून दिलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना आपोआप पोहता येतं. तिथंच त्यांची खरी कसोटी असते, असंही गौतम गंभीर म्हणाला आहे.
advertisement
ड्रेसिंग रूममध्ये खूप पारदर्शकता - गौतम गंभीर
मुलांना खोल समुद्रात फेकून द्या, ही सर्वात सोपी पद्धत आहे. शुभमन गिलला कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करताना आम्ही त्याच्यासोबतही असंच केलं, अशी कबुली देखील गौतम गंभीरने दिली आहे. तसेच ड्रेसिंग रूममध्ये खूप पारदर्शकता आहे. ही एक अतिशय प्रामाणिक ड्रेसिंग रूम आहे आणि आम्हाला ती तशीच ठेवायची आहे, असं देखील गंभीर म्हणाला.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया तयार नाही - हेड कोच
टीम इंडियाच्या टी-ट्वेंटी कामगिरीवर गंभीरने मोठं वक्तव्य केलं. मला वाटतं की, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडिया पूर्णपणे तयार नाही. आपण जिथे पोहोचायला हवे होते तिथे पोहोचलो नाही, असं वक्तव्य गौतम गंभीर याने केलं आहे. म्हणून आशा आहे की, खेळाडूंना तंदुरुस्त राहण्याचं महत्त्व समजेल. आपल्याला जिथे पोहोचायचे आहे तिथं पोहोचण्यासाठी आपल्याकडे तीन महिने शिल्लक आहेत, असंही गंभीर म्हणाला आहे.
