TRENDING:

वर्ल्ड कप ट्रॉफी आणि हनुमान मंदिर वादावर गौतम गंभीरने खासदाराला झापलं, 'हा तर खेळाडूंचा अपमान'

Last Updated:

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हनुमान मंदिरात ट्रॉफी नेल्यावर वाद निर्माण झाला. कीर्ति आझाद यांनी टीका केली, तर गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदा ट्रॉफी घेऊन हनुमान मंदिरात गेले. त्यानंतर टीम इंडियाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. काहींनी या गोष्टीला सपोर्टही केला मात्र या विजयाच्या जल्लोषाला नको त्या गोष्टींची किनार देऊन सोशल मीडियावर वाद उकरुन काढण्यात आला. हा वाद सुरू करण्यात माजी क्रिकेटपटू आणि खासदाराचाही एका अंशी सहभाग होता. त्यांनी ट्विट केल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
News18
News18
advertisement

नेमकं काय प्रकरण?

या सगळ्यावर गौतम गंभीरने थेट उत्तर देऊन माजी खासदारालाच झापलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने जवळच्याच हनुमान मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला आणि सोबत वर्ल्ड कपची ट्रॉफीही नेली. यावर बोलताना खासदार कीर्ति आझाद म्हणाले होते की, "खेळ हा कोणत्याही धर्म किंवा जातीचा नसतो. १४० कोटी भारतीयांच्या श्रद्धेचा हा विषय आहे, त्याला धार्मिक स्वरूप देऊ नये."

advertisement

गौतम गंभीरने माजी खासदाराला झापलं

टीएमसी खासदाराने केलेल्या या टीकेवर बोलताना गौतम गंभीरचा पार चढला. "या टीकेला उत्तर देणेही मी गरजेचे समजत नाही. हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. जर कोणी अशा प्रकारे टीका करत असेल, तर तो त्या १५ खेळाडूंच्या मेहनतीचा आणि त्यांच्या यशाचा अपमान आहे. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर या मुलांनी जे दडपण झेलले आणि त्यानंतर हे यश मिळवले, त्याचं मूल्य अशा विधानांनी कमी होतं. हे खेळाडूंवर अन्याय करण्यासारखं आहे."

advertisement

हरभजन सिंगनेही ओढले ताशेरे

गंभीरचा खासदार हरभजन सिंगनेही कीर्ति आझाद यांच्यावर टीका केली आहे. "ट्रॉफी मंदिरात नेण्याच्या घटनेला राजकीय रंग देणे अत्यंत दुर्दैवी आहे. कीर्ति आझाद स्वतः एक क्रिकेटपटू आहेत, त्यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. कदाचित ते खेळापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व देत असावेत," असे हरभजनने ठणकावून सांगितले.इशान किशननेही मी यावर काय बोलू असं म्हणत या टीकेला प्रत्युत्तर देणं महत्त्वाचं मानलं नाही. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला असंही म्हणाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

कीर्ती आझाद यांना ट्रोल केले आहे. तर काहींनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचं ट्विट करून प्रतिक्रिया दिली. मात्र या सगळ्यालाच गौतम गंभीरने खेळाडूंचा अपमान तुम्ही करता असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. खेळाडूंच्या मेहनतीला तुम्ही दुय्यम करता. हे यश टीमसाठी भारतासाठी फार मोलाचं आहे. त्यामुळे यावरुन राजकारण करणं चुकीचं असल्याचंही गंभीरने म्हटलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड कप ट्रॉफी आणि हनुमान मंदिर वादावर गौतम गंभीरने खासदाराला झापलं, 'हा तर खेळाडूंचा अपमान'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल