रूममध्ये येण्याची संधी दिली
हार्दिकच्या फॅनने हे पत्र पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 मॅचपूर्वी लिहिले होते. या भावनिक पत्रात लिहिले आहे. "प्रिय हार्दिक, हे पत्र मी तुम्हाला धन्यवाद... देण्यासाठी लिहीत आहे, कारण तुम्ही माझ्याशी खूप चांगले वागलात आणि मला तुमच्या रूममध्ये येण्याची संधी दिलीत. मी मोठा होऊन तुमच्यासारखा बनू इच्छितो. फॅनने हार्दिकला पुढील मॅचसाठी शुभेच्छा देत लिहिले होतं की, "उद्याच्या मॅचमध्ये तू खूप रन्स काढशील आणि विकेट्स देखील घेशील. त्याने भारताच्या विजयासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
advertisement
हार्दिकच्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिकने टीम इंडियाने मॅच जिंकल्यानंतर हे प्रेमळ पत्र आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले. चाहत्यांनी हार्दिकच्या या पोस्टवर प्रचंड प्रतिसाद दिला. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 मॅचमध्ये टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत 6 विकेट्सने विजय मिळवला. या मॅचमध्ये हार्दिकने बॉलिंगमध्ये 3 ओव्हर टाकल्या आणि एक विकेट घेतली. तर बॅटिंगमध्ये तो 7 रन्स करून नाबाद राहिला होता.
फायनलमध्ये पांड्या जिंकवून देणार?
दरम्यान, हार्दिक पांड्याने आशिया कपसाठी खास केस कलर केले आहेत. पांढऱ्या केसांची पांड्याची स्टाईल अनेकांना आवडल्याचं पहायला मिळतंय. तर पांड्या आपल्या ऑलराऊंडर कामगिरीने देखील सर्वांना चकित करत असल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये पांड्या कशी कमागिरी करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.