महाराष्ट्र केसरीच्या फायनल सामन्यात 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने पहिल्या मिनिटालाचा आक्रामक सुरुवात केली होती. तर अनुभवी हर्षवर्धन सदगीर संयमी खेळीने सूरूवात केली होती. यावेळी हर्षवर्धनला बाहेर केल्याने महेंद्रला एक गुण मिळाला होता. त्यानंतर महेंद्र गायकवाडचा दुहेरी पटाचा प्रयत्न हर्षवर्धन सदगीनरने धुडकावून लावला होता. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरला एक गुण देण्यात आला होता.कारण महेंद्रला ताकीद देऊन ही तसाच खेळ खेळत होता.शेवटी 3 मिनिटाच्या खेळानंतर सामना 1-1 बरोबरीत होता.
advertisement
सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख या दोन्ही दोन्ही मल्लांनी पहिल्या मिनिटापासून आक्रामक सूरूवात केली होती. यावेळी 'बाहुबली' महेंद्र सिकंदर शेखने ताबा मिळवत दोन गुण मिळवले होते. त्यानंतर स्टेपआऊट करून महेंद्र गायकवाडला एक गुण पटकावून 3 गुणांची आघाडी घेतली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाड 3 गुण सिकंदर शेख शुन्य गुणावर होता.
त्यानंतर महेंद्र गायकवाडला अॅक्टीव्हीटी पिरियडचा टाईम देण्यात आला होता. पण अॅक्टीव्हीटी पिरियडमध्ये महेंद्र गायकवाडला गुण घेता आला नाही, त्यामुळे हर्षवर्धनच्या खात्यात एक गुण आला. अशाप्रकारे त्याची दोन गुणांची आघाडी झाली.त्यानंतर पुन्हा एक डाव टाकत हर्षवर्धन सदगीरने दोन गुण पटकावले आणि 4 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या क्षणी महेंद्र गायकवाड हा आक्रामक होताना दिसला होता. शेवटी स्टेप आऊटचा महिंद्राने एक गुण मिळवला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आणि हर्षवर्धन सदगीरने 4-3 अशा फरकाने सामना जिंकत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.
दुसऱ्या फेरीत सिकंदर शेखने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला.पण बाहुबली असलेल्या महेद्र गायकवाडने सिकंदरला दोन्ही फेऱ्यात एक गुण घेऊ दिला नाही. आणि शेवटी 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेख 3-0 असा पराभव केला होता. या विजयासह महेद्र गायकवाड माती विभागातून फायनलला पोहोचला होता.
दरम्यान गादी विभागात नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटील यांच्यात अंतिम फेरी पार पाडली होती. या फेरीत दोन्ही मलांनी आक्रामक सुरूवात केली होती. पण हर्षवर्धन सद्गीरने आपल्या अनुभवाचा कस दाखवत अवघ्या 2 मिनिट 12 सेकंदात सोलापूरच्या जय पाटीलचा चितपट केलं होतं.
खरं तर हर्षवर्धन सद्गीरने 10 गुणांची आघाडी घेतली होती, जर जय पाटीलचे शुन्य गुण होते. यावेळी कुस्तीमध्ये दोन पैलवानाच्या गुणांमधला फरक हा 10 झाला तर तांत्रिक विजय (टेक्निकल सुपेरेयारीटी) मानली जाते. त्यामुळे हर्षवर्धन सद्गीरला विजयी घोषित करण्यात आले होते.त्यामुळे हर्षवर्धन सद्गीर माती विभागातून फायनलला पोहोचला होता.
विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात होणार आहे. विजेत्या पैलवानाला विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. यात कुस्ती क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान असलेली मानाची गदा विजेत्या मल्लाला दिली जाणार आहे. यावेळचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.त्यामुळे अंतिम सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळायला मिळू शकते.या बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा दिली जाणार आहे.
