खरं तर मुस्तफिजूरच्या हकालपट्टीनंतर बांग्लादेश प्रचंड आक्रामक झाली.त्यामुळे बांगलादेशचा संघ 2026 चा आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळायला भारतात जाणार नाही, अशी माहिती बांग्लादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.नजरुल यांनी सांगितले की बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) ने बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
बांगलादेशच्या 'त्या' पत्रात काय?
advertisement
ढाका, रविवार, 4 जानेवारी 2026
प्रसिद्धी पत्रक
टी20 विश्वचषक सामन्यांच्या स्थलांतरासाठी BCB ची मागणी
भारत आणि श्रीलंका येथे आयोजित होणाऱ्या 'आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026' शी संबंधित अलीकडील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आज दुपारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) संचालक मंडळाची एक तातडीची बैठक पार पडली.
गेल्या २४ तासांतील घडामोडींचा सखोल आढावा घेत, बोर्डाने भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये बांगलादेश राष्ट्रीय संघाच्या सहभागाबाबत आणि त्याभोवतीच्या एकूण परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
सध्याच्या परिस्थितीचे सविस्तर मूल्यमापन केल्यानंतर आणि भारतातील बांगलादेश संघाच्या सुरक्षा आणि संरक्षणाबाबत वाढत्या चिंता लक्षात घेता, तसेच बांगलादेश सरकारच्या सल्ल्याचा विचार करून, संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की बांगलादेश राष्ट्रीय संघ सध्याच्या परिस्थितीत या स्पर्धेसाठी भारतात जाणार नाही.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, BCB ने अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडे विनंती केली आहे की, इव्हेंट ऑथॉरिटी म्हणून त्यांनी बांगलादेशचे सर्व सामने भारताबाहेरील अन्य ठिकाणी हलवण्याचा विचार करावा.
बांगलादेशी खेळाडू, संघाचे अधिकारी, बोर्डाचे सदस्य आणि इतर संबंधितांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी तसेच संघ सुरक्षित आणि योग्य वातावरणात स्पर्धेत सहभागी होऊ शकेल याची खात्री करण्यासाठी असे पाऊल उचलणे आवश्यक आहे, असे बोर्डाचे मत आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला या परिस्थितीबाबत आयसीसीकडून समजूतदारपणा आणि या प्रकरणावर तातडीने प्रतिसादाची अपेक्षा आहे.
दरम्यान जर बांगलादेशने भारताबाहेर वर्ल्ड कपचे सामने खेळवण्याची मागणी आयसीसीने मान्य केली तर भारतातील मुंबई आणि कोलकत्ताचे सामने संकटात सापडतील. कारण बांगलादेशचे ग्रुप स्टेजमधील सामने हे मुंबई आणि कोलकत्तामध्ये पार पडणार आहे. पण जर बांगलादेशची ही मागणी मान्य झाल्यास मुंबई आणि कोलकत्तामध्ये हे सामने पार पडू शकणार नाही आहेत.
