TRENDING:

Asia Cup ट्रॉफीवरून आयसीसीच्या बैठकीत ड्रामा, मॅटर सोडवण्यासाठी बीसीसीआय-पीसीबीला नवी ऑफर!

Last Updated:

आशिया कप ट्रॉफीचा वाद आयसीसीच्या बैठकीतही समोर आला. बीसीसीआयने आशिया कपची ट्रॉफी अजून मिळाली नसल्याचं आयसीसीच्या बैठकीत सांगितलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : आयसीसी बोर्डाच्या बैठकीचं दुबईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी येणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता, पण शेवटच्या क्षणी मोहसिन नक्वीची आयसीसीच्या बैठकीत एन्ट्री झाली. आयसीसी बोर्डाच्या या बैठकीत आशिया कपच्या ट्रॉफीवरून पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या वादाचा मुद्दाही समोर आला.
भारताने वसूल केली आशिया कप ट्रॉफीची किंमत, हाताखालून गेले 100 कोटी, नक्वीला पत्ताही लागला नाही!
भारताने वसूल केली आशिया कप ट्रॉफीची किंमत, हाताखालून गेले 100 कोटी, नक्वीला पत्ताही लागला नाही!
advertisement

बीसीसीआयने आशिया कपची ट्रॉफी मिळाली नसल्याचं आयसीसीच्या बैठकीमध्ये सांगितलं, यानंतर आयसीसी बोर्डाने बीसीसीआय, पीसीबी आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यामधील गतिरोध दूर करण्याची ऑफर दिली. तसंच गरज पडल्यास या समस्येचे निराकरण करण्यासाठी एखाद्या समितीची स्थापनाही केली जाऊ शकते, अशी माहितीही समोर आली आहे.

ट्रॉफीवरून भारत-पाकिस्तानमध्ये वाद

दुबईमध्ये झालेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला होता, पण टीम इंडियाने आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे आणि पीसीबीचे अध्यक्ष तसंच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी याच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. दोन्ही देशांमधील वादामुळे टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करायलाही नकार दिला. यानंतर नक्वी दुबईच्या मैदानातून ट्रॉफी घेऊन निघून गेला. तसंच टीम इंडियाला आपणच ट्रॉफी देणार यावर नक्वी अडून राहिला.

advertisement

नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला

मोहसिन नक्वी हा पीसीबी प्रमुख आणि एसीसीचा अध्यक्ष आहे, तसंच तो पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्रीही आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी नक्वीने भारताविरोधात गरळ ओकली होती, त्यामुळे भारतीय टीमने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

आशिया कप 2025 दरम्यान भारताने पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारले. पहलगाम हल्ल्याविरुद्ध भारताने कडक भूमिका घेतली आणि सुपर फोर सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी सभ्यता आणि शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, बंदुकीच्या सेलिब्रेशनपासून ते विमान अपघातापर्यंत अपमानजनक कृत्ये केली. प्रत्युत्तरादाखल, अंतिम सामना जिंकल्यानंतर भारताने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी एक तास ट्रॉफी धरून स्टेजवर उभे राहिला, पण सादरीकरण समारंभाला कोणताही भारतीय खेळाडू उपस्थित राहिला नाही. शेवटी, नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup ट्रॉफीवरून आयसीसीच्या बैठकीत ड्रामा, मॅटर सोडवण्यासाठी बीसीसीआय-पीसीबीला नवी ऑफर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल