मी माझ्या वडिलांसारखा नाही
युवी म्हणाला, "मी माझ्या वडिलांसारखा (योगराज सिंग) अजिबात नाहीये. मी खूप वेगळी व्यक्ती आणि वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या कोचिंगची पद्धत खूप वेगळी आहे." माझा विश्वास आहे की, जेव्हा तुम्ही कोणाला कोच किंवा मेंटॉर करता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या जागी उभे राहून त्यांचा माईंडसेट समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना काय वाटत आहे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. त्यांना फक्त काय करायचे हे सांगण्याऐवजी, त्यांच्या मनातील भावना ऐकून घेणे महत्त्वाचे असल्याचं युवराज सिंग म्हणाला आहे.
advertisement
माईंडसेट समजून घेणं आवश्यक
प्रशिक्षक आणि गुरू यांचं नातं एका 'पुश अँड पुल' प्रमाणे असायला हवे. तुम्ही काही गोष्टी घ्या आणि काही गोष्टी द्या. 19 वर्षांच्या तरुणांच्या मनात काय चालले आहे हे समजून घेणे महत्त्वाचे असतं, असं युवराज सिंग म्हणाला आहे. युवा खेळाडूंसाठी त्यांचा माईंडसेट समजून घेणं आवश्यक आहे, असंही युवराज सिंग म्हणाला आहे.
जुन्या दिवसांची आठवण
युवराजने आपल्या जुन्या दिवसांची आठवण करत सांगितलं, "मी 19 वर्षांचा असताना, मी ज्या आव्हानांचा सामना करत होतो, ते कोणीही समजून घेतले नाही. त्यामुळे जेव्हा मी आता 19 किंवा 20 वर्षांच्या खेळाडूंना पाहतो, तेव्हा त्यांना मानसिकरित्या कोणती आव्हाने येत आहेत, हे मला माहीत असते. त्यामुळे त्यांना काय करायचे हे सांगण्याऐवजी, त्यांचे ऐकून घेणे, त्यांचा माईंडसेट समजून घेणे आणि त्यानुसार काम करणे महत्त्वाचे ठरते.", असंही युवराज सिंग म्हणाला आहे.
