Blouse Shopping : लग्नासाठी रेडीमेड ब्लाऊज फक्त 200 रुपयांपासून, आकर्षक डिझाईनमध्ये इथं करा खरेदी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
आकर्षक रंगसंगती आणि ट्रेंडी डिझाईनमधील रेडीमेड ब्लाऊज केवळ 200 रुपयांपासून उपलब्ध करून देत आहे.
मुंबई : लग्नसराईचा हंगाम सुरू होताच बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साडी, ज्वेलरी आणि मेकअपची खरेदी जोरात सुरू आहे. मात्र या सगळ्या तयारीत महिलांना सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे ब्लाऊज वेळेवर शिवून मिळत नाही आणि टेलरिंगचे दर झपाट्याने वाढले आहेत.
या समस्येवर उपाय म्हणून दादर येथील प्रांजल ब्लाऊज सेंटर महिलांसाठी आकर्षक रंगसंगती आणि ट्रेंडी डिझाईनमधील रेडीमेड ब्लाऊज केवळ 200 रुपयांपासून उपलब्ध करून देत आहे. येथे सध्या विविध साईज, कट आणि फॅब्रिकमध्ये ब्लाऊजची मोठी श्रेणी ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. साडीसोबत मॅच होणारे वेगवेगळ्या रंगांतील ब्लाऊज लग्न, पार्टी, पारंपरिक कार्यक्रमांसाठी उत्तम ठरत आहेत.
advertisement
येथील साधा स्लीव्हलेस ब्लाऊज केवळ 200 मध्ये मिळतो आणि त्यात तब्बल 15 ते 20 रंग पाहायला मिळतात. सेटिन मटेरियलमधील स्लीव्हलेस ब्लाऊज 300 मध्ये, चिकनकारी ब्लाऊज 350 मध्ये आणि खादी कॉटन ब्लाऊज 450 च्या रेंजमध्ये मिळतो. फॅन्सी ब्लाऊज तसेच सिल्वर टिकली डिझाईनचा ब्लाऊज 300 मध्ये मिळतो. व्ही नेक डिझाईनचा ब्लाऊज 300 मध्ये तर फुल अस्तिन फुल वर्क ब्राइड ब्लाऊज 350 मध्ये उपलब्ध आहे.
advertisement
या सर्व ब्लाऊजमध्ये 36 ते 40 या साईजपर्यंत पर्याय उपलब्ध असून फ्री साईज ब्लाऊजही मिळतात. त्यामुळे प्रत्येक महिलेला आपल्या शरीरयष्टीला अनुरूप ब्लाऊज सहजपणे मिळतो. सर्व ब्लाऊज उच्च दर्जाच्या कापडात तयार केलेले असून त्यांची फिटिंग आणि कटिंग उत्कृष्ट आहे.
प्रांजल ब्लाऊज सेंटर हे दादर (ईस्ट) येथील कैलास लस्सीच्या लाईनमध्ये स्थित आहे. लग्नसराईच्या दिवसांत वेळ आणि पैसा वाचवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरत आहे. कमी किंमतीत ट्रेंडी आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारचे ब्लाऊस एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्राहकांचा या दुकानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Blouse Shopping : लग्नासाठी रेडीमेड ब्लाऊज फक्त 200 रुपयांपासून, आकर्षक डिझाईनमध्ये इथं करा खरेदी

