IND vs AUS : हजारो प्रेक्षकांचा जीव धोक्यात, गिल-अभिषेकला मैदानाबाहेर नेलं, ब्रिस्बेनच्या स्टेडियममध्ये काय घडलं?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा टी-20 सामना अचानकपणे थांबवण्यात आला आहे. हजारो प्रेक्षकांचे जीव धोक्यात आल्यामुळे त्यांनाही स्टेडियमबाहेर जायला सांगण्यात आलं आहे.
ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा टी-20 सामना अचानकपणे थांबवण्यात आला आहे. पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाचा स्कोअर 52/0 एवढा झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनाही मैदानातून थेट ड्रेसिंग रूममध्ये जायला सांगण्यात आलं, तसंच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांचा जीव धोक्यात आल्याचं लक्षात येताच, त्यांनाही स्टेडियम रिकामं करायला सांगण्यात आलं. मॅच थांबवण्यात आली तेव्हा शुभमन गिल 16 बॉलमध्ये नाबाद 29 आणि अभिषेक शर्मा 13 बॉलमध्ये नाबाद 23 रनवर खेळत होता.
ब्रिस्बेनमध्ये अचानक काय झालं?
ब्रिस्बेनच्या मैदानामध्ये लाईव्ह मॅच सुरू असतानाच अचानक स्क्रीनवर स्टेडियम रिकामं करण्याचा मेसेज देण्यात आला. ब्रिस्बेनमधलं हवामान सध्या खराब आहे, त्यामुळे मोकळ्या जागेत राहणं असुरक्षित आहे. धोका टाळण्यासाठी एखाद्या छपराखाली जाऊन उभे राहा आणि स्टेडियममधल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असा मेसेज ब्रिस्बेनमधल्या मोठ्या स्क्रीनवर झळकला, त्यानंतर प्रेक्षकही स्टेडियममधून बाहेर आले आणि सुरक्षित स्थळी जाऊन उभे राहिले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या या सामन्याची सगळी तिकीटं विकली गेली आहेत, त्यामुळे स्टेडियम हजारो प्रेक्षकांनी पूर्णपणे भरलेलं आहे.
advertisement
हवामान विभागाने ब्रिस्बेनमध्ये वादळ आणि वीजेच्या कडकडाटासह पावसाचा अर्लट दिला. यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये ब्रिस्बेनमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. याआधी सीरिजच्या पहिल्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला, त्यामुळे मॅच रद्द केली गेली. आता हा सामना लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
सीरिजच्या दुसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला, त्यानंतर भारताने लागोपाठ दोन सामन्यात विजय मिळवून सीरिजमध्ये 2-1 ची आघाडी मिळवली. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडिया सीरिजही जिंकेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया जिंकली तर सीरिज 2-2 ने बरोबरीत सुटेल.
advertisement
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श, मॅथ्यू शॉर्ट, जॉश इंग्लिस, टीम डेव्हिड, जॉश फिलीप, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वारशुईस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ऍडम झम्पा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 3:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : हजारो प्रेक्षकांचा जीव धोक्यात, गिल-अभिषेकला मैदानाबाहेर नेलं, ब्रिस्बेनच्या स्टेडियममध्ये काय घडलं?


